देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


1. Maharashtra Political Crisis LIVE: आज 'महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल'; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला अवघ्या काही तासांत, 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसलाही आजच


Maharashtra Political Crisis Live Updates: 21 जून 2022... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी महाराष्ट्रात थरारक आणि अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरू झाला. 10 महिन्यांनंतर या सत्तासंघर्षाचा महानिकाल आज लागणारेय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल एकमताने दिला जाण्याची आणि फक्त सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे, शिवसेनेसह ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला. उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र? शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. वाचा सविस्तर 


2. Weather Updates : कुठं कडक उन्हाचा तर कुठं मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज


Weather Updates : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणावत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात पडलेल्या पावसामुळं उष्णतेपासून दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा देशात तापमानाचा (Temperature) पारा वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सध्या देशाच्या राजधानीसह अनेक भागात तापमान हे 40 अंशाच्या पुढे गेलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर काही भागात मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. वाचा सविस्तर


3. Golden Temple: अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात पुन्हा स्फोट; तिसऱ्या स्फोटानं खळबळ, पोलिसांकडून कसून तपास


Blast in Golden Temple: पंजाबमधील (Punjab) अमृतसर (Amritsar) येथील सुवर्ण मंदिर (Golden Temple) परिसरात एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत. पहिल्या दोन स्फोटांनंतर गुरुवारी सुवर्ण मंदिरात तिसरा स्फोट झाला. हा स्फोट आधीच्या बॉम्बस्फोटांपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर चारही बाजूंनी सील केला आहे. वाचा सविस्तर


4. Karnataka Exit Poll: कर्नाटकात काँग्रेस की भाजप ? की जेडीएस पुन्हा बनणार किंग मेकर? एक्झिट पोलमधून समोर येतेय आश्चर्यकारक आकडेवारी


ABP News C voter Karnataka Exit Poll:  कर्नाटकात अडीच हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता 13 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून त्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागले आहे. यापूर्वी एबीपी न्यूज सी व्होटरने कर्नाटकचा एक्झिट पोल समोर आणला आहे. सध्याच्या कलावरून असं दिसतंय की काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल पण त्याला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कुमारस्वामी यांचा जेडीएस पक्ष किंगमेकर बनणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. वाचा सविस्तर


5. PM Modi US Visit: PM मोदी अमेरिका दौरा करणार; बायडन यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा


PM Modi America Visit: अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जिल बायडन (Jill Biden) यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुढील महिन्यात अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं बुधवारी यासंदर्भात माहिती दिली. वाचा सविस्तर


6. Agriculture News : बिहार सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, केळी उत्पादकांना मिळणार 50 टक्के अनुदान 


Agriculture News : शेती क्षेत्रात सातत्यानं नव नवीन प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी (Farmers) चांगलं उत्पादन घेत आहेत. कमी खर्चात चांगल उत्पादन घेण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी विविध राज्यातील सरकारे शेती क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत. आता बिहार सरकारनं (Bihar Government) राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. वाचा सविस्तर 


7. UPSC Exam Calendar 2024 : यूपीएससीकडून 2024 मधील परीक्षांचं कॅलेंडर जारी, जाणून घ्या कोणत्या तारखेला कोणती परीक्षा?


UPSC Releases Exam Calendar 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 साठी UPSC परीक्षेचे कॅलेंडर जारी केलं आहे. ज्या उमेदवारांना यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये बसायचे आहे ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे कॅलेंडर तपासू शकतात. याद्वारे उमेदवारांना पुढील वर्षी कोणती परीक्षा कोणत्या तारखेला होणार हे त्यांना कळेल. त्यानुसार, ते त्यांच्या तयारीसह पुढे जाऊ शकतात. दरम्यान या माहितीमध्ये बदल देखील होऊ शकतात. बदलाची शक्यता फार कमी आहे, पण ती नाकारता येत नाही. परीक्षेचे कॅलेंडर पाहण्यासाठी upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या. वाचा सविस्तर 


8. 11th May In History:  पोखरणमध्ये अणुचाचणी, सआदत हसन मंटो यांचा जन्म; आज इतिहासात


11th May In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारताने राजस्थानमधील पोखरणमध्ये पुन्हा एकदा अणू चाचणी घेतली. 11 मे आणि 13 मे 1998 रोजी अणुचाचणी घेतली. या दोन दिवसात एकूण पाच अणुचाचण्या घेण्यात आल्या. अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1857 च्या बंडात भारतीयांनी दिल्ली ताब्यात घेतली होती.  संवेदनशील, प्रतिभाशाली उर्दू साहित्यिक सआदत हसन मंटो यांचा आज जन्म दिवस आहे. एक नजर इतिहासातील प्रमुख घडामोडींवर... वाचा सविस्तर


9. Horoscope Today 11 May 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य


Horoscope Today 11 May 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज सिंह राशीच्या बेरोजगार लोकांना मित्रांच्या मदतीने चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तर, वृश्चिक राशीला नवीन वाहनाचा लाभ मिळेल. आजचा गुरुवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर