UPSC Releases Exam Calendar 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2024 साठी UPSC परीक्षेचे कॅलेंडर जारी केलं आहे. ज्या उमेदवारांना यूपीएससीच्या विविध परीक्षांमध्ये बसायचे आहे ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन हे कॅलेंडर तपासू शकतात. याद्वारे उमेदवारांना पुढील वर्षी कोणती परीक्षा कोणत्या तारखेला होणार हे त्यांना कळेल. त्यानुसार, ते त्यांच्या तयारीसह पुढे जाऊ शकतात. दरम्यान या माहितीमध्ये बदल देखील होऊ शकतात. बदलाची शक्यता फार कमी आहे, पण ती नाकारता येत नाही. परीक्षेचे कॅलेंडर पाहण्यासाठी upsc.gov.in या वेबसाईटला भेट द्या.


कोणत्या तारखेला कोणती परीक्षा?


अधिकृत वेळापत्रकात दिलेल्या माहितीनुसार, UPSC CSE (Civil Service Exam) 2024 ची  परीक्षा रविवार, 26 मे 2024 रोजी घेतली जाईल. यासाठी उमेदवार 14 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 दरम्यान अर्ज करु शकतात. तर भारतीय वन सेवा (Indian Forest Service) पूर्व परीक्षेसाठीही हेच वेळापत्रक पाळलं जाईल. 


एनडीए परीक्षा कधी?


UPSC NDA I आणि NA I आणि CDS I परीक्षा 2024 21 एप्रिल 2024 रोजी आयोजित केली जाईल. यासाठी 20 डिसेंबर 2023 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. तर NDA II आणि NA II आणि CDS II परीक्षा 9 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. यासाठी अर्ज 15 मे 2024 पासून सुरु होईल आणि 4 जून 2024 पर्यंत चालेल.


UPSC परीक्षेचे कॅलेंडर कसं पाहाल हे जाणून घ्या.


परीक्षेचं कॅलेंडर पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट म्हणजे upsc.gov.in वर जा.
येथे Annual Calendar 2024 नावाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा.
यानंतर नवीन पेज ओपन होईल. ही एक पीडीएफ फाईल असेल ज्यावर तुम्ही 2024 च्या परीक्षेच्या तारखा पाहू शकाल.
ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करुन तिथे तारखा पाहा आणि स्वतःसाठी महत्त्वाच्या तारखा चिन्हांकित करा.
या पीडीएफ फाईलची प्रिंट काढा.
ही प्रिंट भविष्यात तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.