Nandurbar : दरवर्षी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात केळीची लागवड करण्यात आली आहे. मात्र, सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचा पिकांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळं (unseasonal rain) नंदूरबार जिल्ह्यात केळीच्या बागांचं (Banana) मोठ नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे.


नैसर्गिक आपत्तीचा फटका केळी बागांना


नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी दहा हजार हेक्टरपेक्षा आधिक क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात येत असते. दरवर्षी येणार्‍या नैसर्गिक आपत्तीचा फटका केळी बागांना मोठ्या प्रमाणात बसत असतो. यावर्षी आतापर्यत झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात केळी बागा उध्वस्त झाल्या आहेत. एकीकडे सरकारकडून मिळणारी मदत अत्यल्प असते तर दुसरिकडे सरकार ने सुरू केलेल्या केळीच्या पिक विम्यासाठीही शेतकार्‍यांना आडचणी येत असल्याने केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे .


मदत देण्याची मागणी 


अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसात मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झाले आहे. वादळी वार्‍यामुळे हे नुकसान आधिक झाले आहे. आता झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. तर आगोदर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले असून अजूनही मदत मिळाली नाही एकीकडे शासनाकडून मिळणारी नुकसान तोडणी असते त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यापेक्षा सरकार थट्टा करत आसल्याचा शेतकर्‍यांनी संगितले आहे .


विम्यासाठी अडचणी


एकीकडे नुकसान झाल्यावर शेतकर्‍यांना मिळणारी मदत नुकसान भरुन येण्याइतकी मोठी नसते. तर केळी उत्पादक शेतकरी पिक विमा काढण्यासाठी ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येत असतो. मात्र साईड चालत नसल्याने अनेक शेतकर्‍यांचे केळी पिकांचे विमा निघाला नसल्याची स्थिति जिल्ह्यात आहे . सरकार देत असलेली भरपाई कमी असते तर दुसरी कडे विम्यासाठी आडचणी त्यामुळे केळी उत्पादक दुहेरी संकटात आहे .