Blast in Golden Temple: पंजाबमधील (Punjab) अमृतसर (Amritsar) येथील सुवर्ण मंदिर (Golden Temple) परिसरात एकापाठोपाठ एक स्फोट होत आहेत. पहिल्या दोन स्फोटांनंतर गुरुवारी सुवर्ण मंदिरात तिसरा स्फोट झाला. हा स्फोट आधीच्या बॉम्बस्फोटांपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळाचा परिसर चारही बाजूंनी सील केला आहे.
दुपारी (बुधवारी) 12.15 च्या सुमारास स्फोट
सुवर्ण मंदिराजवळ मोठा आवाज ऐकू आल्यानंतर पोलिसांनी संशयितांना श्री गुरु रामदास जी निवास इमारतीबाहेर घेरलं. अमृतसरचे पोलीस आयुक्त नौनिहाल सिंह यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, रात्री 12.15 च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की, मोठा आवाज ऐकू आला, बहुधा पुन्हा स्फोट झाला असावा. हा स्फोट होता याची आम्ही अद्याप पुष्टी करत नाही, याप्रकरणी अद्यार तपास सुरू आहे.
लोकांची चौकशी सुरूये
सचखंड श्री हरमंदिर साहिबचे व्यवस्थापक विक्रमजीत सिंह यांनी माहिती देताना सांगितलं की, ही घटना श्री गुरु रामदास सरनच्या मागील बाजूस असलेल्या कॉरिडॉरमध्ये घडली. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सतत होत असलेल्या स्फोटांमुळे लोकांमध्ये भिती पसरली आहे.
यापूर्वीही झालेत 2 स्फोट
अमृतसरच्या हेरिटेज स्ट्रीट परिसरात शनिवारी पहिला बॉम्बस्फोट झाला. हेरिटेज स्ट्रीटजवळील एका स्वयंपाक घरातील चिमणीमुळे हा स्फोट झाला होता. स्फोट इतका जोरदार होता की, काचा आणि खडे भाविकांच्या अंगावर पडले. काही घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटानंतर सुमारे 32 तासांनी आणखी एक स्फोट झाला. सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा स्फोट झाला होता.
पाच दिवसांत स्फोटाची तिसरी घटना
अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ 5 दिवसांत स्फोटाची ही तिसरी घटना आहे. सर्वात आधी, 6 मे रोजी सुवर्ण मंदिराकडे जाणाऱ्या हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट घडवण्यात आला. त्यानंतर 8 मे रोजी त्याच ठिकाणी दुसरा स्फोट झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली होती. आता कालच्या स्फोटानंतर एकापाठोपाठ होणाऱ्या स्फोटांमुळे चिंता वाढली आहे.
NIA कडून वारंवार होणाऱ्या स्फोटांची चौकशी सुरू
अमृतसर सुवर्ण मंदिर परिसरात झालेल्या 2 स्फोटांनंतर तपास यंत्रणा (NIA) सतर्क झाली आणि सोमवारी रात्री उशिरा तपासासाठी पोहोचली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर NIA टीमनं संपूर्ण दृश्य पुन्हा तयार केलं. हेरिटेज स्ट्रीट परिसरात झालेल्या या दोन स्फोटानंतर अमृतसर पोलीस सतर्क झाले आहेत.