ABP News C voter Karnataka Exit Poll:  कर्नाटकात अडीच हजाराहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. आता 13 तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून त्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागले आहे. यापूर्वी एबीपी न्यूज सी व्होटरने कर्नाटकचा एक्झिट पोल समोर आणला आहे. सध्याच्या कलावरून असं दिसतंय की काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल पण त्याला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कुमारस्वामी यांचा जेडीएस पक्ष किंगमेकर बनणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


एक्झिट पोलनुसार, कर्नाटकातील ग्रेटर बेंगळुरू प्रदेशात काँग्रेसला 39 टक्के मतांसह 11-15 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर भाजपला 45 टक्के मतांसह 15-19 जागा मिळू शकतात. जेडीएसला 13 टक्के मतांसह 1-4 जागा मिळतील. दुसरीकडे, 3 टक्के मतांसह 0-1 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.


ग्रेटर बंगलोर प्रदेशात कोणाला किती मते मिळण्याची शक्यता? (32 जागा)



  • भाजप- 45%

  • काँग्रेस - 39%

  • JDS- 13%

  • इतर - 3%


ग्रेटर बंगलोर प्रदेशात कोणाला किती जागा मिळण्याची शक्यता?



  • भाजप-15-19 जागा

  • INC-11-15 जागा

  • JDS-1-4 जागा

  • इतर-0-1 जागा


एक्झिट पोलनुसार, कर्नाटकातील ओल्ड म्हैसूर भागात काँग्रेस आणि जेडीएसमध्ये लढत दिसून येत असून भाजप पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. काँग्रेसला 28-32 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 0-4 जागा मिळू शकतात. जेडीएसला 19-23 जागा मिळतील. दुसरीकडे 0-3 जागा अपक्षांच्या खात्यात जाताना दिसत आहेत.


ओल्ड म्हैसूर प्रदेशात कोणाला किती जागा मिळतील? (55 जागा)



  • भाजप- 0-4  जागा

  • INC- 28-32 जागा

  • JDS- 19-23 जागा

  • इतर- 0-3 जागा


जुन्या म्हैसूर भागात कोणाला किती मते मिळाली?



  • भाजप- 26%

  • काँग्रेस- 38%

  • JDS- 29%

  • इतर- 7%


एक्झिट पोलनुसार, मध्य कर्नाटक भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत दिसून येत आहे. काँग्रेसला येथे 18-22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 12-16 जागा मिळू शकतात. जेडीएसला 0-2 जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे 0-1 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.


मध्य कर्नाटक विभागात कोणाला किती जागा मिळतील? (35 जागा)



  • भाजप- 12-16  जागा

  • INC- 18-22 जागा

  • JDS- 0-2 जागा

  • इतर- 0-1 जागा


मध्य कर्नाटक विभागात कोणाला किती मते मिळाली?



  • भाजप-39%

  • काँग्रेस-44%

  • JDS-10%

  • इतर-7%