एक्स्प्लोर

Morning Headlines 6th November: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज

IMD Weather Forecast Today : राज्यात (Maharashtra Weather) थंडी (Cold Weather) ची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस पारा खाली जाताना दिसत आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेतानाही दिसत आहेत. राज्यासह देशभरात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी जाणवत आहे. दरम्यान, राज्यासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. वाचा सविस्तर 

Indian Air Force : भारतीय लष्कराची सुसज्ज 'रॉकेट फोर्स'! बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसह आधुनिक क्षेपणास्त्रे

Indian Air Force Rocket Force : अलिकडच्या काळात भारत लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत आहे. आता लवकरच भारतीय लष्कर (Indian Army) ला स्वत:ची सुसज्ज अशी रॉकेट फोर्स मिळणार आहे. रॉकेट फोर्सच्या दिशेने काम करणाऱ्या भारतीय लष्करासाठी मोठी बातमी आहे. लवकरच लष्कराला सुमारे 1500 किलोमीटरच्या पल्ल्याच्या कमी पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे (Ballestic Rocket) मिळू शकतात. भारतीय लष्कराची सुसज्ज रॉकेट फोर्स हे दिवंगत CDS जनरल बिपिन रावत यांची योजना होती. भारताचे माजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) दिवंगत जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) हेही रॉकेट फोर्स तयार करण्याच्या दिशेने काम करत होते. वाचा सविस्तर 

Israel Hamas War : इस्रायल हमासवर अणुबॉम्ब हल्ला करणार? इस्रायली मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ; पंतप्रधान नेतन्याहू म्हणतात...

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel Gaza War) यांच्यातील युद्ध काही थांबताना दिसत नाही. इस्रायलमे गाझा पट्टी (Gaza Strip) तील आणखी एका निर्वासित शिविरावर हल्ला केला आहे. मात्र, इस्रायली लष्कराने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझावर अणुबॉम्ब टाकला जाऊ शकतो, असं इस्रायलच्या एका मंत्र्यानं म्हटलं आहे. इस्रायलकडे असलेल्या पर्यायांपैकी हा एक पर्याय आहे. इस्रायली मंत्र्याच्या या वक्तव्यामुळे फक्त हमास आणि पॅलेस्टाईनमध्येच नव्हे तर अरब देशांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. गाझा पट्टीवर अणुबॉम्ब टाकायचा का असा प्रश्न विचारण्यात आला, यावर इस्रायली मंत्री अमिहाई एलियाहू म्हणाले, "ही एक शक्यता आहे". वाचा सविस्तर 

Asian Champions Trophy: भारताच्या पोरींची कमाल; एशियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात जपानवर मात, सुवर्णपदकाला गवसणी

Asian Champions Trophy 2023: भारतीय महिला हॉकी संघानं रविवारी (5 नोव्हेंबर, 2023) झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात जपानचा 4-0 असा पराभव करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. वाचा सविस्तर 

6 November In History : दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींना अटक, अभिनेता संजीव कुमार यांचे निधन, सचिनला भारतरत्न जाहीर; आज इतिहासात...

6 November On This Day :  प्रत्येक दिवस हा इतिहासातील अनेक महत्त्वांच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशीदेखील इतिहासात महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी अब्राहम लिंकन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. तर, महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधातील आंदोलनासाठी अटक करण्यात आली. आपल्या अभिनयाने छाप सोडणारे अभिनेते संजीव कुमार यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर 

Numerology: 'या' जन्मतारखेच्या लोकांनी चुकूनही 'या' लोकांशी लग्न करू नये, नाते जास्त काळ टिकत नाही, अंकशास्त्रात म्हटलंय..

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित आहे. हे 0 ते 9 अंकांच्या दरम्यान आहेत. अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येची स्वतःची खासियत असते. मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व इतर सर्व मूलांक संख्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असेल. विवाहाच्या बाबतीत, या लोकांनी विशिष्ट क्रमांकाच्या लोकांपासून सावध राहावे. अंकशास्त्रात काय म्हटलंय? वाचा सविस्तर 

Horoscope Today 6 November 2023 : सोमवारचा दिवस खास! आज 'या' राशीला होणार आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख लाभेल, राशीभविष्य पाहा

Horoscope Today 6 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 6 नोव्हेंबर 2023 सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांनी बाहेरचे अन्न खाणे टाळावे, तुमचे कोलेस्ट्रॉल वाढू शकते, वृश्चिक राशीचे लोक आज आपल्या जोडीदारासोबत चांगली संध्याकाळ घालवू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget