Weather Forecast : कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज
IMD Weather Update : राज्यासह देशभरात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी जाणवत आहे.
IMD Weather Forecast Today : राज्यात (Maharashtra Weather) थंडी (Cold Weather) ची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस पारा खाली जाताना दिसत आहे. गुलाबी थंडीची चाहूल लागल्याने नागरिक शेकोटीचा आधार घेतानाही दिसत आहेत. राज्यासह देशभरात गारठा वाढताना दिसत आहे. दुपारच्या वेळी उकाडा जाणवत असला तरी सकाळी आणि रात्री गुलाबी थंडी जाणवत आहे. दरम्यान, राज्यासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
राज्यात काही भागात जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण किनारपट्टी भागात सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं हवामान पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाणे या ठिकाणीही तापमान वाढ कायम आहे. सकाळी हवेत गारवा अनुभवायला मिळत आहे. एकीकडे गारठा वाढत असताना दुसरीकडे, वायू प्रदूषण आणि धुके यांनीही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे.
केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज 6 नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामन विभागाने जनतेला सुरक्षितेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण द्वीपकल्पीय भारतात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. तमिळनाडू आणि केरळ आणि रायलसीमा येथे वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते खूप मुसळधार पाऊस नोंदवला गेला आहे. मुसळधार पावसाची नोंद झाली. वेगवेगळ्या ठिकाणी.
दिल्लीला प्रदूषणाचा विळखा
दिल्लीमध्ये धुक्याच्या चादर पाहायला मिळत आहे. प्रदूषणामुळे लोकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. दिल्लीच्या तापमानात सध्या फारसा बदल होण्याची शक्यता नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दिवसा तसेच रात्री थंडी आणि धुके पाहायला मिळत आहे. येत्या आठवडाभरात उत्तराखंडमधील हवामान डोंगरापासून मैदानी भागात कोरडे राहण्याची शक्यता आहे. यासोबतच कडक सूर्यप्रकाश असेल, त्यामुळे मैदानी भागात तापमान वाढू शकते. जर आपण दिल्लीत दिवसाचे कमाल तापमान 31 अंशांच्या दरम्यान आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :