Morning Headlines 5th November: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Elvish Yadav: एल्विश यादव मेनका गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार, व्हिडीओ शेअर करुन म्हणाला...
Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी 2 या कार्यक्रमाचा विजेता एल्विश यादव (Elvish Yadav) हा सध्या रेव्ह पार्टीमुळे चर्चेत आहे. हे सर्व प्रकरण 3 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. जेव्हा नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एफआयआर दाखल केला.आता एल्विश यादवनं माझ्यावर केले गेलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच एल्विशनं नुकताच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये तो सांगतो की, मी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मेनका गांधी (Maneka Gandhi) यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. वाचा सविस्तर
Nepal Earthquake : नेपाळमधील भूकंपातील मृतांची संख्या 157 वर; भारताकडून आपत्कालीन मदत क्रमांक जारी
Nepal Earthquake : नेपाळमध्ये (Nepal) शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळाला. पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे (Nepal Earthquake) मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. नेपाळ गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाजरकोट आणि रुकुम पश्चिममध्ये आतापर्यंत 157 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि सुमारे 200 लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, "भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, तर रुकुम पश्चिममध्ये 2,500 घरे उद्ध्वस्त झाली आहेत". अधिकाऱ्यांनी सांगितले की, "भूकंपग्रस्त भागातील बेघर लोकांना तंबू, ब्लँकेट आणि अन्नपदार्थांची नितांत गरज आहे." तर, जाजरकोट जिल्ह्यातील बरेकोट ग्रामीण नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणाले की, ""भूकंपामुळे त्यांच्या भागातील 80 टक्के घरांचे नुकसान झाले आहे." वाचा सविस्तर
ABP Cvoter Opinion Polls: काँग्रेस की भाजप, राजस्थानात कोणाची सत्ता? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष
ABP Cvoter Opinion Polls: राजस्थान : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या (Rajasthan Assembly Elections 2023) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. राजस्थानमधील (Rajasthan Elections) भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) हे दोन प्रमुख राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) त्यांच्या योजनांच्या आधारे राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा करत असताना, भाजप नेते यावेळी त्यांचा पक्ष प्रचंड बहुमतानं राजस्थानात निवडणूक जिंकेल, असा दावा करत आहेत. दरम्यान, एबीपी न्यूज (ABP News) आणि सीव्होटरनं (ABP Cvoter) एकत्रितपणे एक सर्वेक्षण केलं आहे, ज्यामध्ये जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाचा सविस्तर
गरिबीशी लढा देण्यासाठी AI हे शक्तिशाली साधन, स्टार्टअप प्रणालीत देशाची जगात ओळख : गोयल
Piyush Goyal : कृत्रिम बुद्धिमत्ता हे गरिबीशी लढा देण्यासाठी शक्तिशाली साधन असल्याचे मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केलं. दुर्गम भागात वस्तू आणि सेवा पोहोचवण्यासाठी तसेच भविष्यासाठी कामगारांमध्ये पुन्हा कौशल्य निर्माण करण्याचे साधन असल्याचे गोयल म्हणाले. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जागतिक स्तरावर अग्रस्थानी असेल आणि आंतरराष्ट्रीय स्टार्टअप प्रणालीमध्ये आपली विशेष ओळख निर्माण करेल असेही गोयल म्हणाले. वाचा सविस्तर
5 October In History : ईस्ट इंडिया कंपनीला नाणे पाडण्यास मंजुरी, केट विन्स्लेटचा जन्म, स्टीव्ह जॉब्जचे निधन; आज इतिहासात
5th October In History : जगभरात संगणक आणि मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती आणण्याच्या कार्यात अग्रेसर असणारे आणि अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्ज (Steve Jobs) यांचे 5 ऑक्टोबर 2011 रोजी निधन झालं. तर ऑस्कर पुरस्कार विजेती अभिनेत्री केट विन्स्लेट हिचा जन्मही आजच्याच दिवसाचा. जाणून घेऊया आजच्या दिवस इतिहासातील कोणत्या घटनांचा साक्षीदार आहे. वाचा सविस्तर
Horoscope Today 5 November 2023 : शनीने बदलली चाल, आता 'या' राशी असतील धनवान, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 4 November 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. शनि कुंभ राशीत मार्गी झाला आहे. याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. ग्रहांच्या चालीनुसार वृषभ राशीच्या लोकांनी मनशांतीसाठी दिवसातून एकदा मंदिरात जाणे चांगले राहील. आज वृश्चिक राशीच्या लोकांनी बाहेरचे अन्न शक्य तितके कमी खावे आणि घरचे बनवलेले अन्न खावे. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर