एक्स्प्लोर

Morning Headlines 26th October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

पंतप्रधान मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, साईचरणी होणार नतमस्तक, दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद

PM Modi at Shirdi Ahamadnagar Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (26 ऑक्टोबर 2023) अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) दौऱ्यावर येत आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) आणि अकोले (Akole) या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून शिर्डी शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा (PM Modi Public Meeting) होणार आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : चक्रीवादळ 'हामून' बनले धोकादायक! आज 5 राज्यांत अतिवृष्टीचा इशारा; इतर शहरातील हवामान जाणून घ्या 

IMD Weather Prediction of 26 October 2023 : बंगालच्या उपसागरात बांगलादेशजवळ सक्रिय असलेले चक्रीवादळ 'हामून' धोकादायक बनले आहे. त्याच्या प्रभावामुळे आज देशातील 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटनंतर आता तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होत असल्याचे दिसून येत आहे. तर लवकरच राज्यात थंडीची चाहूल लागण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर 

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) म्हणजे, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. एल्विश आपल्या फॅन मूव्हमेंट्समुळे नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाचा सविस्तर 

Small Saving Schemes: मोदी सरकारच्या 'या' योजना हिट, लोक करतायत बक्कळ गुंतवणूक, व्याजही मिळतंय भरपूर

Small Saving Schemes: आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या कमाईचा काहीसा भाग बाजुला काढून त्याची बचत करतो. खरं तर उतारवयासाठी ही बचत केली जाते. तसेच, अनेकजण बचत केलेला पैसा एखाद्या योजनेत किंवा स्किममध्ये गुंतवतात (Investment). त्यासाठी एखादी सुरक्षित, विश्वासार्ह्य आणि मोठा परतावा मिळवून देणाऱ्या योजनांना पहिली पसंती मिळते. अशा बचतीसाठी अल्पबचत योजना (Small Saving Schemes) लोकांची पहिली पसंती ठरते. जरा थांबा असं आम्ही नाही सांगत, तर या योजनांचे समोर आलेले आकडे सांगतायत. नरेंद्र मोदी सरकारनं (Narendra Modi Govt) अल्पबचत योजनांबाबत उचललेल्या पावलांचा परिणाम दिसून येत आहे, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये (Senior Citizens Saving Scheme) चांगलं हित महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एप्रिल-सप्टेंबर या तिमाहीत या योजनांमधील गुंतवणुकीत मोठी झेप घेतली आहे. वाचा सविस्तर 

26 October In History : जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन, अभिनयाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याचा जन्म; आज इतिहासात

26th October In History : भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने आजच्या दिवसाचं महत्व मोठं आहे. आजच्याच दिवशी जम्मू आणि काश्मीर हे संस्थान भारतात विलीन झालं होतं. त्यानंतर भारताने मोठी कारवाई करत काश्मीरमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यास सुरूवात केली. विनोदाचा बादशाह अशी ओळख असलेल्या लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याचा (Laxmikant Berde) आज जन्मदिन. वाचा सविस्तर

Horoscope Today 26 October 2023 : मेष, कर्क, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; पाहा 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 26 October 2023 : आज 26 ऑक्टोबर 2023, राशीभविष्यानुसार, आजचा गुरुवार (Horoscope Today) हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज वृषभ राशीच्या लोकांनी सर्वांशी मर्यादेत बोलावं. आज वृश्चिक राशीचे लोक समाधानी असतील, तुमच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी गुरुवार कसा राहील? वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget