Small Saving Schemes: मोदी सरकारच्या 'या' योजना हिट, लोक करतायत बक्कळ गुंतवणूक, व्याजही मिळतंय भरपूर
Small Saving Schemes Investment : एप्रिल-सप्टेंबर सहामाहीत, ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्या योजनांमधील गुंतवणूक वाढली आहे, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी ठेवींमध्ये वर्षागणिक जवळपास 2.5 पटींची वाढ झाली आहे आणि यातील गुंतवणूक 74,625 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
Small Saving Schemes: आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या कमाईचा काहीसा भाग बाजुला काढून त्याची बचत करतो. खरं तर उतारवयासाठी ही बचत केली जाते. तसेच, अनेकजण बचत केलेला पैसा एखाद्या योजनेत किंवा स्किममध्ये गुंतवतात (Investment). त्यासाठी एखादी सुरक्षित, विश्वासार्ह्य आणि मोठा परतावा मिळवून देणाऱ्या योजनांना पहिली पसंती मिळते. अशा बचतीसाठी अल्पबचत योजना (Small Saving Schemes) लोकांची पहिली पसंती ठरते. जरा थांबा असं आम्ही नाही सांगत, तर या योजनांचे समोर आलेले आकडे सांगतायत. नरेंद्र मोदी सरकारनं (Narendra Modi Govt) अल्पबचत योजनांबाबत उचललेल्या पावलांचा परिणाम दिसून येत आहे, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये (Senior Citizens Saving Scheme) चांगलं हित महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एप्रिल-सप्टेंबर या तिमाहीत या योजनांमधील गुंतवणुकीत मोठी झेप घेतली आहे.
एप्रिलपासून आतापर्यंत गुंतवणुकीत 2.5 पट वाढ
अहवालानुसार, एप्रिल-सप्टेंबर सहामाहीत केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणार्या योजनांमधील गुंतवणूक वाढली नाही, तर महिलांनी चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांमध्येही हा आकडा लक्षणीय वाढला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांच्या ठेवी वर्षानुवर्षे जवळपास 2.5 पटीनं वाढल्या आहेत आणि 74,625 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. एका अधिकाऱ्याचा हवाला देत असं म्हटलं आहे की, मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत एकूण गुंतवणुकीत 28,715 कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच, 160 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मिळतंय व्याज
सरकारनं ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित योजनांवरील व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा (Senior Citizens Saving Sheme) व्याजदर जून तिमाहीत 8 टक्क्यांवरून 8.2 टक्क्यांवर गेला आहे. याशिवाय, आवर्ती ठेव योजनेत 20 बेसिस पॉइंट्सची वाढही दिसून आली.
'या' योजनेतही रेकॉर्डब्रेक गुंतवणूक
एकीकडे व्याजदरात वाढ झाल्यामुळे वृद्धांसाठी चालवल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांमधील गुंतवणुकीत वाढ झाली आहे, तर दुसरीकडे महिलांसाठी सुरू असलेल्या बचत योजनांबाबत बोलायचं झालं तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate) किंवा सप्टेंबरमध्ये एमएसएससीमध्येही (MSSC) वाढ झाली आहे. या तिमाहीत गुंतवणूक वाढून 13,512 कोटी रुपये झाली आहे. ही योजना दोन वर्षांसाठी आणली असून मार्च 2025 पर्यंत खातं उघडता येईल.
एमएसएससी योजना (MSSC Scheme) म्हणजे काय?
केंद्र सरकारनं सुरू केलेल्या एमएसएससी योजनेअंतर्गत महिला दोन वर्षांसाठी 2 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेतील गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. 2 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असलेल्या या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि खातेदारांच्या संख्येत जोरदार वाढ होत आहे. ही योजना सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केली होती आणि त्यात किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.