एक्स्प्लोर

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी; गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?

Bigg Boss OTT Winner Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी सीझन 2 चा विजेता एल्विश यादवकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आलं आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं सांगण्यात येत आहे.

Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस OTT 2 चा विजेता (Bigg Boss OTT Winner) एल्विश यादव (Elvish Yadav) म्हणजे, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. एल्विश आपल्या फॅन मूव्हमेंट्समुळे नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या एल्विश एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. काही अज्ञात लोकांनी एल्विशकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police) सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) एल्विश यादव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एल्विश यादवकडून गुन्हा दाखल 

25 नोव्हेंबर रोजी एल्विशला एक निनावी फोन आला. हा फोन वजिराबाद गावाजवळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एका निनावी फोनद्वारे एल्विश यादवकडून एक कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. हा फोन नेमका कोणी केला? याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. अशा परिस्थितीत त्यांनी गुरुग्रामच्या सेक्टर 53 पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात 358 क्रमांकाचा गुन्हा दाखल केला आहे.

कोण आहे एल्विश यादव?

एल्विश यादव एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. बिग बॉस OTT 2 मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून त्यानं एन्ट्री घेतली होती. बिग बॉसच्या घरात गेल्यापासूनच एल्विशची चाहत्यांमध्ये चर्चा होती. त्यानंतर काही काळातच चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता. बिग बॉस OTT 2 चं टायटलही एल्विशनं जिंकलं होतं. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विशची प्रसिद्धी आणि फॅन फॉलोईंग झपाट्यानं वाढली आहे. त्याच्या फॅन्समध्ये त्याच्या 'सिस्टीम'च्या चर्चा रंगल्या आहेत. आता एल्विश यादवला गाण्यांपासून ते अनेक चित्रपटांच्याही ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

एल्विशनं आपल्या यूट्यूब चॅनलवर कॉमेडी व्हिडीओ बनवून लोकांची मनं जिंकलीत. YouTube वर त्याचे अंदाजे 14.5 मिलियन सब्सक्रायबर आहेत. 29 एप्रिल 2016 रोजी एल्विशनं YouTube च्या जगात आपलं पाऊल ठेवलं. पण त्याच्या करिअरसाठी बिग बॉस OTT 2 चा विजेता बननं हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. एल्विश यादव त्याच्या लक्झरी लाईफमुळेही प्रसिद्ध आहे. त्याला महागड्या गाड्यांचाही खूप शौक आहे. यावर्षी एल्विश त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेला होता. चाहत्यांमध्ये एल्विशच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. 

दुबईत खरेदी केलंय घर

बिग बॉस ओटीटी 2 जिंकल्यानंतर एल्विश यादवनं दुबईमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. त्यानं आपल्या चॅनलवर व्लॉग करून आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली. चाहत्यांना दुबईतील घराची सफरही त्यानं आपल्या व्लॉगमधून घडवली. बिग बॉसचा विजेता बनल्यानंतरही त्याचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी त्याचं भव्य स्वागत केलं. 

एल्विशच्या आणखी एका गोष्टीची चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा होताना दिसते, ती म्हणजे, त्याचं कार कलेक्शन. एल्विश यादवच्या गॅरेजमध्ये अनेक देशी-विदेशी ब्रँडच्या कार्स आहेत. त्याच्याकडे Porsche 718 Boxster, Hyundai Verna आणि Toyota Fortuner सारख्या लक्झरी कार आहेत. Porsche 718 Boxster ची किंमत साधरणतः 1.41 कोटी रुपये आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget