Morning Headlines 1st December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
LPG Price Hike: आजपासून वाढले गॅस सिलेंडरचे दर; दिल्लीसह मुंबईतही LPG महागला!
LPG Price Hike, 1 December 2023: आज 1 डिसेंबर, आजपासून 2023 च्या शेवटच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. वर्षाचा शेवटचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका सर्वसामान्यांना बसला आहे. LPG सिलेंडर (LPG Cylinder) आजपासून म्हणजेच, 1 डिसेंबर 2023 पासून, वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून महाग झाला आहे. आधीपासूनच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चाप बसणार आहे. वाचा सविस्तर
MP Exit Poll Results 2023: ज्योतिरादित्य शिंदेंमुळे भाजपला फायदा की काँग्रेसला तोटा? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा
MP Exit Poll Results 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे (Madhya Pradesh Assembly Election 2023) निकाल 3 डिसेंबरला लागणार आहेत. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) काँग्रेसची (Congress) सत्ता येणार की भाजप (BJP) पुन्हा सत्तेत येणार? हे या दिवशी कळेल. एबीपी न्यूज सीव्होटरच्या एक्झिट पोलमध्ये (ABP Cvoter Exit Poll) याबाबतचं चित्र समोर आलं आहे. या एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार बनू शकतं. मात्र, यावेळी ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचा फायदा भाजपला झाला की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचा सविस्तर
असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM ला तेलंगणात किती जागा मिळतील? एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज
ABP Cvoter Exit Poll Telangana Result 2023: तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलमध्ये (Exit Poll Telangana Result) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या भारत राष्ट्र समितीला (BRS) मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, बीआरएससोबत राज्य विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीनला (AIMIMI) किती जागा मिळणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच तेलंगाणाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या हैदराबादमध्ये असदुद्दीन ओवेसी यांची ऑल इंडिया मजलिस मुस्लिमीनला सत्ता काबीज करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. अशातच एक्झिट पोलमधून समोर आलेली आकडेवारी खरंच धक्कादायक आहे. वाचा सविस्तर
Jobs for Women: महिलांसाठी रोजगार वाढला, पण चांगल्या नोकऱ्याच नाहीत; काय सांगते आकडेवारी?
Jobs for Women: भारताचा विकास (Development of India) करायचा असेल तर, निम्म्या लोकसंख्येचे आर्थिक हात मजबूत असले पाहिजेत. जागतिक बँकेनंही (World Bank) अलिकडेच एका निवेदनात म्हटलं होतं की, भारताला प्रगतीच्या शिखरावर चढायचं असेल तर महिलांसाठी उत्तम रोजगाराच्या संधी (Better Employment Opportunities for Women) उपलब्ध करुन द्याव्या लागतील. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम (Women are Financially Empowered) झाल्या, तर भारताचा विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतातील शहरी भागात महिलांमधील रोजगार वाढला आहे. महिलांचा बेरोजगारीचा दर (Unemployment Rate of Women) 8.6 टक्क्यांवर आला आहे. मात्र, अजूनही महिलांना चांगल्या नोकऱ्या (Jobs) मिळत नाहीत, ही चिंतेची बाब आहे. वाचा सविस्तर
2023 आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष; जागतिक हवामान संघटनेकडून अहवाल प्रकाशित
Hottest Year 2023: 2023 वर्षानं उष्णतेचे सर्व रेकॉर्ड्स मोडीत काढले असून हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष (Warmest Year) ठरलं आहे. जागतिक हवामान संघटनेकडून (World Meteorological Organization) COP28 च्या पहिल्या दिवशी यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला. हवामान बदल आणि सध्या सुरु असलेल्या एल निनोच्या परिस्थितीच्या एकत्रित परिणामामुळे ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पृथ्वी आधीच 1.4 अंश सेल्सिअस पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा (1850-1900) अधिक उष्ण असल्याचं संशोधनातून निष्पन्न झालं होतं. तसेच, जगात हरितगृह वायूचं प्रमाणही सतत वाढत असल्याचं निरीक्षण देखील संशोधनातून समोर आलं आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आणि समुद्राच्या पातळीत वाढ नोंदवली गेल्याचं देखील अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. अंटार्क्टिक समुद्रातील बर्फाचं आच्छादन घटल्याचं अहवालात नमूद केलं गेलं आहे. वाचा सविस्तर
भारतावर अॅनोफिलीस डासाची वक्रदृष्टी; 2022 मध्ये देशात मलेरियाचा उद्रेक, तब्बल 66 टक्के रुग्णांची नोंद
मुंबई : राज्यात साथीचा आजारांचा प्रादुर्भाव कायम आहे. मलेरिया, (Malaria) डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनिया आदी आजारांचा फैलाव वाढला आहे. जगात 2022 मध्ये नोंदवलेल्या 52 लाख मलेरियाच्या रुग्णांपैकी 66 टक्के रुग्ण भारतात आढळल्याची माहिती माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) ही आकडेवारी दिली आहे. दक्षिण पूर्व आशियातील कोणत्याही देशासाठी ही संख्या सर्वाधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही 2020 सालची आकडेवारी असून सध्या देशात मलेरिया आटोक्यात आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) 2023 चा वर्ल्ड मलेरीया रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
Movies : रणबीरचा 'Animal' Vs विकीचा 'Sam Bahadur'; बॉक्स ऑफिस कोण गाजवणार?
Bollywood Movies Box Office : वर्षभरात अनेक बिग बगेट सिनेमे (Movies) प्रदर्शित झाले असून या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता वर्षाचा शेवटही धमाकेदार होणार आहे. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हे सिनेमे आज सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. वाचा सविस्तर
1st December In History : जागतिक एड्स दिवस, बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म, सीमा सुरक्षा दलाची स्थापना; आज इतिहासात
एक डिसेंबर हा दिवस अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. यामधील एक घटना तशी किरकोळ आहे, पण त्या घटनेनं इतके मोठे रुप धारण केले की इतिहासात नोंद झाली. 1955 मध्ये रोजा पार्क्स नावाच्या एका सावळ्या वर्णाच्या महिला अलाबामा एका बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी तिने गोऱ्या वर्णाच्या सहप्रवाशासाठी सीट सोडण्यास नकार दिला. या प्रकारामुळे तत्कालीन सरकारी नियम आणि नियमांच्या विरोधात वर्तन केल्याप्रकरणी त्या महिलेला दंड ठोठावण्यात आला होता. वाचा सविस्तर
Horoscope Today 1 december 2023 : आज डिसेंबरचा पहिला दिवस! मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य पाहा
Horoscope Today 1 december 2023 : राशीभविष्यानुसार 1 डिसेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील, त्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? हिंदू धर्मात, पंचांग आणि ग्रह नक्षत्रांवर विश्वास ठेवणारे लोक कुंडलीबद्दल खूप उत्सुक असतात. आजचे राशीभविष्य कसे असेल हे त्यांना जाणून घेणे आवश्यक असते. दैनंदिन राशीभविष्यानुसार आज कोणत्या राशीच्या राशीच्या लोकांना काही विशेष काळजी घ्यावी लागेल? कोणत्या राशीसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे? आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर