Morning Headlines 19th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Ayodhya Ram Mandir: राम मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीराम विराजमान; पहिला फोटो समोर, अरुण योगीराज यांनी साकारलंय तेजस्वी रुप
Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत (Ayodhya) 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भव्य प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देश-विदेशातील दिग्गजांना रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. देशभरातील रामभक्तांना आता फक्त रामललाच्या भेटीची ओढ लागली आहे. देशातील प्रत्येकाच्या मनी रामललाच्या दर्शनाची आस आहे. यापूर्वी गुरुवारी, 18 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पहिलं छायाचित्र समोर आलं आहे... वाचा सविस्तर
22 जानेवारीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 'हाफ डे'; दुपारी अडीचपर्यंत सुट्टी, भावना आणि विनंत्यांचा मान ठेवत मोठा निर्णय
Ram Mandir Ayodhya: अयोध्या : प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी (Lord Sri Rama) अयोध्या (Ayodhya) नगरी नववधूप्रमाणे सजली आहे. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गजांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. 140 कोटी भारतीयांच्या मनात राम नामाचा जप सुरू आहे. अनेकजण हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी अयोध्येच्या दिशेनं रवाना झाले आहेत. आता केवळ चारच दिवस बाकी असून 22 जानेवारीला रामललाची विधीवत पूजा अर्चांसह अभिषेक झाल्यानंतर अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अशातच या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारनं केंद्रीय कार्यालय आणि संस्थांना दुपारी अडीच वाजेपर्यंत 'हाफ डे' ची घोषणा केली आहे... वाचा सविस्तर
Ram Mandir Ayodhya: प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेशात ATS ची मोठी कारवाई; 3 संशयित ताब्यात
Ram Mandir Ayodhya News: अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गजांनाही निमंत्रणं पाठवण्यात आली आहे. तसेच, प्रभू श्रीरामाचा भव्य-दिव्य अभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून अनेक रामभक्त 22 जानेवारीला अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. अशातच या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नवधूप्रमाणे नटलेल्या अयोध्येला छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. या भव्य सोहळ्याला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये, तसेच हा संपूर्ण शिस्तीत पार पडावा यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अयोध्येत तैनात करण्यात आला आहे. अशातच गुरुवारी 19 जानेवारी रोजी दहशतवाद विरोधी पथकानं (ATS) अयोध्येतून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे... वाचा सविस्तर
Vadodara Boat Accident: ना लाईफ जॅकेट, ना इतर कोणतीही सुरक्षा; वडोदरा दुर्घटनेत 12 विद्यार्थ्यांचा करुण अंत; पाच जणांवर गुन्हा दाखल
Vadodara Boat Accident: गुजरातच्या (Gujarat) वडोदरामध्ये (Vadodara) बोट तलावात उलटून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. वडोदरामधील हरणी तलावातील दुर्घटना घडली असून गुजरात सरकारकडून मृतांच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बोटीवर बसलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे... वाचा सविस्तर
16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही, केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना
नवी दिल्ली : खासगी कोचिंग सेंटर्सच्या (Coaching Centres) मनमानी कारभारावर लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने ( Central Government) पावले उचलली आहेत. कोचिंग क्लासेससाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना ( Central Government guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही. रँक, गुणांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे गॅरंटी देणे कोचिंग क्लासेसना महागात पडणार आहे. तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना करणे सर्व क्लासेस ना बंधनकारक असणार आहे... वाचा सविस्तर
19 January In History: वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटचा जन्म, देशाच्या तिसऱ्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधींची निवड; आज इतिहासात
मुंबई: इतिहासात 19 जानेवारी हा दिवस अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचा आहे. या दिवशी जगातील महान शोधकांपैकी एक जेम्स वॅट यांचा जन्म झाला. अनेकदा बल्ब वगैरे घ्यायला गेल्यावर दुकानदार किती वॉटचा बल्ब लागेल, असे विचारतात. बल्बसोबत वॅट हा शब्द का वापरला. वास्तविक वॅट हे शक्तीचे SI एकक आहे. जेम्स वॅट्सच्या योगदानाची ओळख म्हणून वॅटला पॉवरसाठी एसआय युनिट म्हणून निवडण्यात आले. तसेच भारताच्या राजकीय इतिसाहात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1966 मध्ये इंदिरा गांधी देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडून आल्या होत्या... वाचा सविस्तर
Horoscope Today 19 January 2024 : आजचा शुक्रवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 19 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 19 जानेवारी 2024 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांची आज व्यवसायात प्रगती होईल, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे चिंतामुक्त राहाल, सिंह राशीच्या लोकांनी आज टेन्शन घेऊ नका आणि प्रफुल्लित राहा, त्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहील. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर