Morning Headlines 14th August : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
'2024 मध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येणार', अमित शाह यांचा विश्वास तर इंडिया आघाडीवरही साधला निशाणा
गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (13 ऑगस्ट) रोजी इंडिया आघाडीवर निशाणा साधत म्हटलं की, 'विरोधकांची एकजूट म्हणजे जुन्या बाटलीमध्ये जुनी दारु.' तसेच त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवरही गंभीर आरोप यावेळी केले आहेत. '12 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांचा हा गट असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.' वाचा सविस्तर
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी देश सज्ज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज (14 ऑगस्ट रोजी) राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनाने रविवारी (13 ऑगस्ट) एका निवेदनात सांगितले की, हे संबोधन संध्याकाळी 7 वाजल्यापासून ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि सर्व दूरदर्शन वाहिन्यांवर हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारित केले जाणार आहे. वाचा सविस्तर
दिल्लीसह अनेक शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर कायम; जाणून घ्या सविस्तर
मुंबई : देशातील तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल आणि डिझेलचे दर आज सकाळी 6 वाजता अपडेट करण्यात आले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे. वाचा सविस्तर
हिमाचलमध्ये विद्ध्वंस, तर उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट! जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
नवी दिल्ली : देशभरात सक्रिय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज आणि उद्या (14 आणि 15 ऑगस्ट रोजी) राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. आज दिल्लीचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय, 16 ऑगस्ट रोजी दिल्लीत हवामान चांगलं असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वाचा सविस्तर
ज्युनिअर कुस्तीपटूच्या हत्येमधील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचं तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण
नवी दिल्ली : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येतील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. सुशील कुमारने रविवारी (13 ऑगस्ट) रात्री उशिरा तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण केलं. त्याच्यावर ज्युनियर अॅथलीट सागर धनखडचा खून यासह दंगल आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. सागर धनखडच्या हत्येच्या आरोपाखाली सुशील कुमार 2021 पासून तुरुंगात आहे. वाचा सविस्तर
मिथुन, वृश्चिकसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संघर्षाचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
मुंबई : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांना जवळची व्यक्ती भेटू शकते, त्यांना पाहून तुम्ही खूप आनंदी व्हाल. कन्या राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असतील, तर व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर
म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी सोडत, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार बारामतीमध्ये...आज दिवसभरात
मुंबई : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला उद्देशून भाषण करतील. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. तर, दुसरीकडे आज म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत काढली जाणार आहे. वाचा सविस्तर
Today In History : भारताची फाळणी, विलासराव देशमुख आणि विनायक मेटे यांचा स्मृतीदिन; इतिहासात आज
मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 14 ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. विनायक मेटे आणि राकेश झुनझुनवाला यांचे 2022 मध्ये निधन झाले. तर खाशाबा जाधव यांनी 1984 मध्ये अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे 2012 मध्ये निधन झाले होते. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर