Morning Headlines 11th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Novak Djokovic US Open Champion: नोवाक जोकोविच US ओपनचा बादशाह; पटकावलं कारकिर्दीतील 24वं ग्रँडस्लॅम
Novak Djokovic US Open Champion: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) यानं यूएस ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कच्या आर्थर अॅशे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित जोकोविचनं रशियाच्या तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेवचा 6-3, 7-6 (5), 6-3 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. नोव्हाक जोकोविचचं हे 24 वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. आता जोकोविच ओपन एरामध्ये सर्वाधिक ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावणारा खेळाडू ठरला आहे. वाचा सविस्तर
India Vs Pakistan, Asia Cup 2023: टीम इंडिया-पाकिस्तान सामन्याचा आज रिझर्व्ह डे, आजही पावसामुळे सामना झालाच नाही तर...?
India Vs Pakistan, Asia Cup 2023: आशिया चषक 2023 मध्ये टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तानमध्ये सध्या पावसाचंच पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे. आशिया कपमध्ये (Asia Cup 2023) टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येत असलेल्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांपैकी कोणीच नाही, तर पाऊसच जिंकतोय, असं म्हटलं तरी चालेल. वाचा सविस्तर
Chandrababu Naidu Arrest: चंद्राबाबू नायडू न्यायालयीन कोठडीत, अटकेच्या निषेधार्थ आज आंध्रप्रदेश बंदची हाक, आतापर्यंत काय-काय घडलं?
Chandrababu Naidu Arrest Updates: तेलगू देसम पक्षाचे (TDP) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) सध्या आंध्रप्रदेश पोलिसांच्या (Andhra Pradesh Police) ताब्यात आहेत. सध्या त्यांची रवानगी राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. चंद्राबाबूंच्या अटकेपासूनच टीडीपी आक्रमक झाला असून अटकेच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी (9 सप्टेंबर) सीआयडीनं नंदयाल येथून अटक केली होती. एका दिवसानंतर, चंद्राबाबू नायडू यांना रविवारी (10 सप्टेंबर) सकाळी विजयवाडा न्यायालयात हजर करण्यात आलं, तिथे त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली. वाचा सविस्तर
Weather Update: पावसामुळे कुठे दिलासा, तर कुठे आपत्ती; दिल्लीसह इतर राज्यांत आज कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागाचा इशारा
Weather Update Today: देशभरात पावसाने (Rain) पुन्हा एकदा हजेरी लावल्याने वातावरण अल्हाददायक झालं असून, वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील बहुतांश राज्यांत पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीतही गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे दिल्लीतील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज (11 सप्टेंबर) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. वाचा सविस्तर
G20 Summit : भारत-अमेरिकेतील संबंध महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या तत्त्वावर आधारित : जो बायडन
Joe Biden on G20 Summit : भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जी-20 परिषदेचा (G20 Summit) रविवार (10 सप्टेंबर) रोजी समारोप करण्यात आला. या परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भारतात आले होते. त्यांनी रविवारी भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीची प्रशंसा केली आणि सांगितले की, भारत-अमेरिकेतील संबंध हे महात्मा गांधींच्या विश्वस्ततेच्या (ट्रस्टीशिप) तत्वावर आधारित आहे. यावेळी राष्ट्रपती जो बायडन आणि G-20 च्या इतर नेत्यांनी रविवारी नवी दिल्लीतील राजघाटावर महात्मा गांधी यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. वाचा सविस्तर
11th September In History : आचार्य विनोबा भावे यांचा जन्म, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांचा हल्ला; आज इतिहासात...
11th September In History : आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातील भूदान चळवळीचे प्रणेते, स्वातंत्र्यसैनिक आचार्य विनोबा भावे यांचा आज जन्मदिन आहे. आचार्य विनोबा भावे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आजच्या दिवशी 2001 मध्ये जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला दहशतवाद्यांनी धक्का दिला. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. वाचा सविस्तर
Horoscope Today 11 September 2023 : मेष, सिंह, तूळ राशीसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 11 September 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीच्या नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तर, वृषभ राशीच्या लोकांना उद्या नोकरीत बढती मिळू शकते. एकूणच, मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर