एक्स्प्लोर

Monsoon Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता, लोकसभेचे 48 टक्के तर राज्यसभेचे  44 टक्के कामकाज  

18 जुलैपासून सुरु झालेलं संसदेच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session ) सोमवारी (8 ऑगस्ट) संस्थगित करण्यात आलं.

Monsoon Session : 18 जुलैपासून सुरु झालेलं संसदेच पावसाळी अधिवेशन (Monsoon Session ) सोमवारी (8 ऑगस्ट) अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात 22 दिवसांच्या कालावधीत 16 बैठका झाल्या आहे. 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत एकूण 18 बैठका घेण्याचे नियोजित होते. मात्र, अत्यावश्यक शासकीय कामकाज पूर्ण झाल्यामुळं तसेच आगामी दोन राजपत्रित आणि सरकारी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर सदस्यांची मागणी लक्षात घेऊन अधिवेशनाचा कालावधी  कमी करण्यात आला आहे. लोकसभेत  48 टक्के तर राज्यसभेत  44 टक्के कामकाज झाले.
 
या अधिवेशनादरम्यान, विविध महत्वाची विधेयके मंजूर करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पाच विधेयके मंजूर करण्यात आली आहेत. 

महत्त्वाची विधेयके

कौटुंबिक न्यायालये  (सुधारणा) विधेयक, 2022
सामूहिक विनाशाची शस्त्रे आणि त्यांची वितरण प्रणाली (बेकायदेशीर कारवायांना  प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2022,
भारतीय अंटार्क्टिका विधेयक, 2022
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन  विरोधी विधेयक, 2021
केंद्रीय विद्यापीठे (दुरुस्ती) विधेयक, 2022

लोकसभेत, नियम 193 अन्वये महागाईवर  एक अल्पकालीन चर्चा झाली. लोकसभेत भारतातील खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज आणि त्यासंदर्भात सरकारनं उचललेली पावले यावर गौरव  गोगोई यांनी 31 मार्च 2022 रोजी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पुढील चर्चा  घेण्यात आली. मात्र, ती पुन्हा अनिर्णायक  राहिली. राज्यसभेत, अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींबाबत  नियम 176 अंतर्गत एक अल्पकालीन चर्चा झाली. 

चार दिवस आधीच अधिवेशनाची सांगता

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरु झालं होतं. हेअधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार होते. मात्र, चार दिवस आधीत अधिवशनाची सांगता झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा कालखंड आहे. येणाऱ्या 25 वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे असल्याचे म्हटले होते.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना निरोप

राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा सोमवारी शेवटचा दिवस होता. जगदीप धनखड हे आता नवीन उपराष्ट्रपती असणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची धनखड शपथ घेणार आहेत. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget