एक्स्प्लोर
मालकाला पेरु देऊन माकडाचा दुकानातील गल्ल्यासह पोबारा

हैदराबाद : हैदराबादच्या गुंटूरमध्ये चक्क एका माकडाने चोरी केल्याची आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. एका माकडानं ज्वेलर्सच्या दुकानातून चक्क नोटांचं बंडल लंपास केलं आहे. श्री ललिता ज्वेलर्स नावाच्या दुकानात ही घटना घडली आहे. माकडानं दुकानात आल्यानंतर मालकाला पेरु देऊ केला. मात्र मालकानं पेरु न घेतल्यामुळे माकडानं तो पेरु फेकून मारला आणि दुकानात प्रवेश मिळवला. त्यानंतर ते माकड थेट दुकानाच्या गल्ल्यावर जाऊन बसलं. गल्ल्यातील 10 हजाराचं बंडल घेऊन माकडानं पळ काढला. या मर्कटलीलांमुळे स्थानिक व्यापारी चांगलेच चक्रावून गेले आहेत.
आणखी वाचा























