(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधुनिक हिरकणी! मुलासाठी दुचाकीवरुन तब्बल दीड हजार किलोमीटरचा प्रवास
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आपल्या मुलाला आणण्यासाठी एका महिलेने तब्बल दीड हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ही आधुनिक हिरकणी हैदराबाद येथील रहिवासी आहे.
हैदराबाद : देशात लॉकडाऊन जाहीर झालं अन् क्षणात संपूर्ण देश स्तब्ध झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याने अनेकजण शेकडो किलोमीटर दूर वेगवेगळ्या शहरात आणि राज्यात अडकले. अशात एका महिलेने आपल्या मुलाला घरी आणण्यासाठी स्कुटीवरुन तब्बल एक हजार चारशे किलोमीटरचा प्रवास केलाय. रझिया बेगम अशा या शिक्षक महिलेचे नाव असून निझामाबादमधील बोधाना या ठिकाणची आहे. शाळेत अडकलेल्या आपल्या मुलाला आणायला त्यांनी थेट आंध्र प्रदेशमधील नेल्लोर गाठलं. या प्रवासासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेतली होती.
पोलिसांकडून परवानगी घेणार्या रझिया बेगम यांना अनेक ठिकाणी रोखण्यात आले. पण, त्यांनी अधिकाऱ्यांना प्रवास महत्वाचे असल्याचं पटवून दिल्याने त्यांचा मार्ग मोकळा होत गेला. आपल्या मुलासमवेत आपल्या गावी पोहोचल्यानंतर त्यांनी ही माहिती सांगितली. रझियाचा मुलगा निजामुद्दीन, याने हैदराबादच्या कोचिंग अॅकॅडमीमध्ये क्लास लावले आहेत. त्याला डॉक्टर व्हायचे आहे. निजामुद्दीन गेल्या महिन्यात नेल्लोर येथील मित्रासह बोधन येथे गेला होता. मात्र, मित्राचे वडिलांची तब्बेत अस्वस्थ असल्याने ते पुन्हा 12 मार्चला नेल्लोरला गेले. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने तिथेचं अडकले.
Plasma treatment | सकारात्मक बातमी! भारतात कोरोनावर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर होणार
मुलाच्या भेटीची ओढ मला घेऊन गेली कोरोना संकटकाळी आपला मुलगा परराज्यात अडकल्याने आईचा जीव कासावीस झाला अन् त्यांनी मुलाला घरी आणण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन रझिया यांनी आपली व्यथा मांडली. त्यावर पोलिसांनीही त्यांना प्रवास करण्याविषयी पत्र दिले. मात्र, तरीही अनेक ठिकाणी त्यांना रोखण्यात आलं. माझा प्रवास किती महत्वाचा आहे, माझा मुलगा एकटाच अडकला आहे, अशी विनंती करुन प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रवासासाठी मुभा मिळवली. अखेर त्यांनी आध्र प्रेदशमधील नेल्लोर गाठत आपल्या मुलाची भेट घेतली. "माझा रस्ता अनेक सुमसाम होता, रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हते. काही ठिकाणी दाट झाडी होती. मात्र, मुलाच्या भेटीची ओढ लागल्याने मला कशाचीच भीती वाटली नाही" अशी प्रतिक्रिया रझिया यांनी दिली आहे. मुलाला घरी आणल्याने समाधानी असल्याचंही त्या म्हणाल्या.
Lockdown | लॉकडाऊनमुळे भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण घटलं, ICMR च्या अभ्यासातून समोर