एक्स्प्लोर

मोदी सरकार 30 वर्षांपेक्षा जास्त नोकरी केलेल्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना मुदतीआधीच निवृत्त करणार!

मोदी सरकार आता अकार्यक्षम आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांना मुदतीआधीच सेवानिवृत्त करणार आहे. यासंदर्भात एक सर्क्युलर जारी केलं असून 30 वर्षांपेक्षा जास्त नोकरी केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचं परीक्षण करण्यास सांगण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आपल्या सर्व विभागातील नोकऱ्यांमध्ये 30 वर्ष पूर्ण केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाचं परीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. यामधील अकार्यक्षम आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांची नोंद करुन त्यांना जनहितार्थ मुदतीआधी सेवानिवृत्त करण्यास सांगण्यात आलं आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ही एक नियमित प्रक्रिया आहे, जी पुन्हा एकदा अंमलात आणली जात आहे.

वाणिज्य मंत्रालयाकडून सर्क्युलर जारी वाणिज्य मंत्रालयाने 28 ऑगस्ट रोजी सर्व मंत्रालय आणि विभागांसाठी एक सर्क्युलर जारी केला आहे. या सर्क्युलरमध्ये त्या नियमाचा दाखला देण्यात आला आहे, ज्यात जनहितार्थ सरकार एखाद्या कर्मचाऱ्याला मुदतीआधी सेवानिवृत्त करु शकतं. निवृत्त करण्याचा आधार अकार्यक्षमता आणि भ्रष्ट आचरण असेल. सरकारी सेवेत 30 वर्षे पूर्ण केलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नावांचं परीक्षण करण्याचं सर्क्युलरमध्ये म्हटलं आहे. याशिवाय ज्या सरकारी अधिकाऱ्यांचं वय 55 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांच्या नोंदीचीही समीक्षा करण्याचे निर्देश दिले आहेत.

योग्य काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्त करण्याचा अधिकार सरकारला प्रशासकीय यंत्रणा सुदृढ ठेवणं हा या परीक्षणाचा उद्देश असल्याचं सरकारचं म्हणणं आहे, जेणेकरुन सरकारी कामकाजाची कार्यक्षमता आणि वेग राखता येईल. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी गरज पडल्यास एखाद्या कर्मचाऱ्याला मुदतीपूर्वी सेवानिवृत्त करण्याचा अधिकार सरकारकडे आहे. या सर्क्युलरमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की, "केंद्र सरकारची मूळ नियमावली (Fundamental Rules ) 56(J)(1 ) आणि केंद्रीय लोक सेवा पेन्शन नियमावली ( CCS Pension Rule ) 1972 च्या नियम 48 अंतर्गत योग्य काम न करणाऱ्या निवृत्त करण्याचा अधिकार सरकारकडेआहे."

2014-2020 दरम्यानही सरकारी कर्मचारी निवृत्त या नियमाअंतर्गत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची नोटीस किंवा तीन महिन्यांचं वेतन देण्याची तरतूद आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शनची सुविधा असेलच. लोकसभेत दिलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात वाणिज्य राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले होते की, "ही एक सतत आणि नियमित चालणारी प्रक्रिया आहे." आकडेवारीचा दाखल देत ते म्हणाले होते की, "या नियमानुसार जुलै 2014 पासून जानेवारी 2020 पर्यंत ग्रुप 'ए' मधील 163 आणि ग्रुप 'बी'मधील 157 कर्मचाऱ्यांना मुदतीआधीच निवृत्त करण्यात आलं."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market Crash: केवळ पाच दिवसात 18 लाख कोटी स्वाहा, स्टॉक मार्केटमध्ये धूळधाण, शेअर मार्केट इतकं का पडलं?
शेअर मार्केटमध्ये लाल चिखल, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले, घसरणीची नेमकी कारणं कोणती?जाणून घ्या
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
HSC Exam : परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
बारावीच्या परीक्षेत हेराफेरी, इंग्रजीच्या पेपरला तोतया परीक्षार्थी बसला, एका चुकीनं बिंग फुटलं अन्... 
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Crash: केवळ पाच दिवसात 18 लाख कोटी स्वाहा, स्टॉक मार्केटमध्ये धूळधाण, शेअर मार्केट इतकं का पडलं?
शेअर मार्केटमध्ये लाल चिखल, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले, घसरणीची नेमकी कारणं कोणती?जाणून घ्या
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
HSC Exam : परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
बारावीच्या परीक्षेत हेराफेरी, इंग्रजीच्या पेपरला तोतया परीक्षार्थी बसला, एका चुकीनं बिंग फुटलं अन्... 
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
Jasprit Bumrah : मोठी बातमी, जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर,टीम इंडियाला धक्का, बीसीसीआयनं कुणाला दिली संधी?
जसप्रीत बुमराह टीम इंडियातून बाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोठा धक्का, रोहित शर्मा कुणाला संधी देणार?   
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Embed widget