एक्स्प्लोर
बेपत्ता 'जय' वाघ सापडला, तेलंगणा सरकारचा दावा
मुंबई: नागपुरातून बेपत्ता झालेला 'जय' वाघ सापडल्याचा दावा तेलंगणा सरकारनं केला आहे. एप्रिल महिन्यापासून जय बेपत्ता आहे. जय वाघ तेलंगणाच्या पैनगंगा जंगलात दिसल्याचा रिपोर्ट तेलंगणाच्या वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. तसेच या वृत्ताला तेलंगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांनीही दुजोरा दिला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेला आशियातील सर्वात मोठा वाघ 'जय' बेपत्ता होता. त्याचा शोधही बरेच दिवस सुरु होता. अखेर आज जय वाघ तेलंगणामध्ये दिसल्याचं वृत्त तेथील एखा स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलं. त्यानंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलांगणाचे वनमंत्री जुगारामण्णा यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. जुगारामण्णा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
दरम्यान, 'जय' वाघ तेलंगणातील जंगलात सापडला आहे. असं आम्हाला लेखी कळवा त्याचे फोटो आणि व्हिडिओ द्या. असं सुधीर मुनगंटीवार यांनी तेलंगणाच्या वनमंत्र्यांना सांगितलं आहे. हे पुरावे मिळल्यानंतरच महाराष्ट्र सरकार याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती समजते आहे.
नागपूरच्या उमरेड अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली होती.
जय : आशियातील सर्वात मोठा वाघ
आशियातील सर्वात मोठा वाघ अशी जयची ओळख आहे. तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता.
तीन वर्षांपूर्वी जोडीदाराच्या शोधात जय उमरेडमध्ये
जोडीदाराच्या शोधात तीन वर्षांपूर्वी जय नद्या, शेत, इतकंच नाही तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा 100 किमी प्रवास करुन उमरेड अभयारण्यात आला होता. यानंतर तो सगळ्यांचा आवडता वाघ बनला. मात्र सहा वर्षांचा हा वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी वन्यप्रेमी, फोटोग्राफर्स, स्वयंसेवक तसंच गाईड यांनी जयच्या शोधासाठी मोहीम राबवली होती.
संबंधित बातम्या:
आशियातील सर्वात मोठा वाघ बेपत्ता, 'जय'च्या शोधासाठी 100 जणांची टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement