Miss Universe 2020 : भारताची अॅडलिन कॅसेलिनो मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकणार का?
या वर्षी फ्लोराडिया या ठिकाणी होणाऱ्या मिस युनिव्हर्स 2020 (Miss Universe 2020) या स्पर्धेत अॅडलिन कॅसेलिनो (Adline Castelino) ही 22 वर्षीय युवती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.
फ्लोराडिया : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 69 व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेला हॉलिवूड, फ्लोराडिया या ठिकाणी सुरुवात झाली आहे. त्यासाठी जगभरातील सौंदर्यवती एकत्र जमल्या आहेत. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व अॅडलिन कॅसेलिनो (Adline Castelino) ही 22 वर्षीय युवती करत आहे. तिच्या माध्यमातून मिस युनिव्हर्सचा मुकूट भारतात येणार का अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे.
जर अॅडलिन कॅसेलिनोने हा किताब जिंकला तर अशी कामगिरी करणारी ती तिसरी भारतीय महिला असणार आहे. या आधी 1994 साली सुश्मिता सेन आणि 2000 साली लारा दत्ता यांनी हा किताब जिंकला आहे.
Moving on to the next round...India! #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodF pic.twitter.com/AnvsOqhFAv
कोण आहे अॅडलिन कॅसेलिनो?
अॅडलिन कॅसेलिनोचा जन्म कुवेत येथे झाला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी ती भारतात आली आणि मुंबई येथे सेटल झाली. अॅडलिन कॅसेलिनोच्या परिवाराची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची असून ते कर्नाटकातील उदयवारा या ठिकाणचे आहे. अॅडलिन कॅसेलिनोने या आधी अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आणि त्या जिंकल्या आहेत. तिने LIVA Miss Diva 2020 किताब पटकावला आहे.
शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या 'विकास सहयोग प्रतिष्ठान' या संघटनेसोबत अॅडलिन कॅसेलिनो काम करत आहे. तसेच ती पीसीओएस फ्री इंडिया कँपेनचा चेहरा आहे. तसेच अॅडलिन कॅसेलिनो ही महिला आणि एलजीबीटी समुदायासाठीही काम करते. तिला फेमिना मॅगेजिनच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळालं आहे. मिस युनिव्हर्समध्ये रॅम्प वॉक करताना तीने भारतीय पद्धतीची साडी नेसली होती. त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. आपण भविष्यात अभिनयाकडे वळणार असल्याचं संकेत तिने दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :