एक्स्प्लोर

Damini App : भू विज्ञान मंत्रालयानं आणलं विजेची पूर्वसुचना देणारं 'दामिनी अॅप', जीवितहानी  टाळण्यासाठी ठरणार वरदान 

भारत सरकारच्या भू विज्ञान मंत्रालयाने वीज पडण्याचा अलर्ट देणारं एक मोबाईल अॅप आणलं आहे. 'दामिनी अॅप' (Damini App) असे या अॅपचे नाव आहे.

Damini App Lightning Alert : दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत होते. विशेषतः शेतकरी, मेंढपाळ यांना शेतात, जंगलात उघड्यावर वीज, वारा यांचा सामना करावा लागतो. मात्र, आता भारत सरकारच्या भू विज्ञान मंत्रालयाने (Ministry of Earth Sciences) एक मोबाईल अॅप आणलं आहे. 'दामिनी अॅप' (Damini App) असे या नवीन अॅपचे नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून आपल्याला आता वीज पडण्याची पूर्वसूचना मिळणार आहे. त्यामुळं अॅप आता वरदान ठरणार आहे. नेमकं काय आहे हे अॅप जाणून घेऊयात....

मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात वीज पडून जीवितहानी होत असते. वीज पडून जीवितहानी होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालयाने 'दामिनी' अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप वीज पडण्याची पूर्वसूचना आपल्या मोबाइलवर देणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व विशेषतः शेतकऱ्यांना वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी दामिनी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
 
आता राज्य शासनाने दामिनी अॅप शासनस्तरावर मान्य करुन सर्व अधिकारी, फिल्ड वर्कर्स, शेतकरी, मेंढपाळ व नागरिकांनी डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा असे आवाहान जिल्हा प्रशासनानं केलं आहे. हे अॅप किती प्रभावी ठरेल हे आगामी काळात समजणार आहे. दामिनी अॅपचा प्रयोग यशस्वी झाल्यास शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले. वीज पडून मृत्यू होण्याची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण गमावतात. दरवर्षी वीज कोसळ्याने शेकडो लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झाले आहेत. बर्‍याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

वीज नेमकी कशी तयार होते?

जमिनीलगत वाहणारी हवा गरम झाल्यावर हलकी होते आणि वर वर जाऊ लागते. पण ती हवा वर जात असताना थंड होत जाते. त्यामुळे हवेत असलेले बाष्प थंड होऊ लागते, त्याचे ढगात रुपांतर होते. मग ते ढग इतके थंड होतात की त्याचे लहान लहान बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. ही हवा अजून थंड झाल्यावर हिमकण तयार होतात. त्यामुळे हे वजनदार हिमकण वेगाने खालच्या दिशेने येऊ लागतात. त्याचवेळी गरम वाफ वरच्या दिशेने जात असते. हवा वजनदार झाल्याने ती खालच्या दिशेने वाहू लागते. या खालून वर आणि वरुन खाली येणाऱ्या हवेतील बाष्प आणि हिमकणांमध्ये घर्षण होते. सतत घर्षणामुळे तिथे फुग्याप्रमाणे ऋण विद्युतभार तयार होतो. आणि जमिनीपासून वर जाणारे बाष्प हे धन विद्युतभारीत (पॉझीटिव्ह चार्ज) असतात. म्हणजेच तेथे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. म्हणजेच मोठ्या प्रमाणात वीज तयार होते. आणि त्यातून तीव्र प्रकाश तयार होतो. ज्याला आपण वीज म्हणतो. तसेच जमिनीवर वीज पाडण्याचे देखील तेच कारण आहे. जमीन ही धन विद्युतभारीत असते. ऋण भार आणि धन भार एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यामुळे सर्वात जवळचा वाहक पाहून वीज त्याठिकाणी पडते. वीज पडताना विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो. कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Kalse on Shivsena : ठाकरे गट पुन्हा फुटला तर काय होईल? शिंदे गटात विलीन की स्वतंत्र पक्ष?Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..Saif Ali Khan Attackerसैफवरील हल्ल्यानंतर CCTV मध्ये दिसणारा माझा मुलगा नाही,आरोपीच्या वडिलांचा दावाUday Samant Mumbai : दावोस दौऱ्यावरुन उदय सामंत परतले, करारांबाबत दिली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
लाडक्या बहिणींकडून पैसे रिकव्हरी करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर
Raigad Guardian Minister : तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
तटकरेंनी पाठीत पुन्हा खंजीर खुपसला; रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वादाचा वणवा
Embed widget