एक्स्प्लोर
Advertisement
राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची संध्याकाळी बैठक
भाजपच्या राज्य कार्यकारणीकडून एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह आहे. मात्र दिल्ली वर्तुळात एकनाथ खडसे यांच्या नावाला मान्यता मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. राज्यसभेवर भाजपच्या तीन जागा निवडून जाऊ शकतात. त्यातल्या तिसऱ्या जागेवर भाजपकडून कुणाला संधी मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. याआधीच भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचं नाव निश्चित झालंय. त्यातच तिसऱ्या जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना संधी मिळू शकते, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या आजच्या बैठकीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
भाजपच्या राज्य कार्यकारणीकडून एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा आग्रह आहे. मात्र दिल्ली वर्तुळात एकनाथ खडसे यांच्या नावाला मान्यता मिळेल की नाही याबद्दल साशंकता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी राज्यातील भाजपचे नेते दिल्लीत गेले होते. त्यावेळी या यादीवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
कोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपतोय?
येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेचे एकून सात सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही. तर राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांचं नाव देखील निश्चित मानलं जात आहे. तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांना यावेळी राज्यसभेवर संधी मिळणार का याचीही उत्सुकता आहे.
Special Report | एकनाथ खडसेंना भाजप राज्यसभेवर पाठवणार का? | ABP Majha
येत्या 26 मार्चला निवडणूक
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठीच्या निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. येत्या 26 मार्चला राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे. तर 26 मार्चलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्राला एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 ला संपत आहे.
येत्या 6 मार्चला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 13 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 16 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 18 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर 26 मार्चला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मतदान पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
संबंधित बातम्या :
राज्यसभेच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद, राष्ट्रवादीची एक जागा देण्याची काँग्रेसची मागणी
राज्यसभेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कोण-कोण राज्यसभेवर जाणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement