एक्स्प्लोर

लोकपाल नियुक्तीच्या बैठकीत सहभागी होणार नाही, खर्गेंचं मोदींना पत्र

लोकपाल नियुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. मात्र आपण बैठकीत सहभागी होऊ शकत नसल्याचं खर्गेंनी मोदींना पत्र लिहून कळवलं आहे.

नवी दिल्ली : लोकपाल नियुक्तीसाठी आज (गुरुवार) बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे सहभागी होणार असल्याची माहिती होती. मात्र या बैठकीला येणार नसल्याचं खर्गेंनी कळवलं आहे. विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा देऊन न बोलावल्यामुळे या बैठकीला न जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून याबाबत कळवलं आहे. लोकपाल नियुक्तीसाठी होणाऱ्या बैठकीत निमंत्रित व्यक्ती म्हणून सहभाग घेणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारने निवड समितीच्या बैठकीत खर्गेंना विशेष अतिथीच्या रुपात बोलावलं होतं. विशेष निमंत्रण हा लोकपाल नियुक्तीच्या प्रकरणात विरोधकांचा आवाज वेगळा करण्याचा एक प्रयत्न आहे, असा आरोपही खर्गेंनी केला. लोकपाल कायद्यानुसार लोकसभेतील विरोधी पक्ष नेता हाच समितीचा सदस्य असतो आणि खर्गे हे विरोधी पक्ष नेते नाहीत. त्यामुळे समितीमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा देण्यात आलेला नाही. ''निवड समितीच्या बैठकीत अधिकारांशिवायच निमंत्रित व्यक्ती म्हणून सहभाग घेणं, विचार मांडणं आणि मतदान करणं हे चुकीचं असेल. ज्यामुळे लोकपाल नियुक्ती प्रक्रियेत विरोधी पक्षाने सहभाग घेतला होता, हे दाखवलं जाईल,'' असं खर्गेंनी पत्रात म्हटलं आहे. शिवाय लोकपाल कायद्याचा मान राखण्यासाठी हे निमंत्रण नाकारणं गरजेचं असल्याचंही खर्गेंनी म्हटलंय. लोकपाल नियुक्ती रखडलेलीच लोकपाल नियुक्तीसाठी हालचाली सुरु केल्या असल्याचं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं. सरकार यासाठी कायदेशीर प्रक्रियेने पाऊल उचलत आहे. लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 साली अस्तित्त्वात आला होता. मात्र आतापर्यंत लोकपाल नियुक्ती झालेली नाही. लोकसभेत विरोधी पक्ष नेता नसल्याचं कारण सरकारने आतापर्यंत पुढे केलं आहे. 2014 च्या निवडणुकीनंतर लोकसभेत एकाही पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या, की विरोधी पक्षाचा दर्जा मिळेल. त्यामुळे लोकसभेत कुणीही विरोधी पक्ष नेता नाही आणि त्यामुळेच लोकपालची नियुक्ती होऊ शकत नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपाल नियुक्त करा : सुप्रीम कोर्ट लोकपाल बिलाच्या दुरुस्तीच्या नावावर त्याची अंमलबजावणी टाळणं अयोग्य आहे. लोकपाल कायदा आहे त्या परिस्थितीत लागू करा, देशभरात लोकपालची नियुक्ती झाली पाहिजे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला 8 ऑक्टोबर 2017 रोजी दिले होते. लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपाल नियुक्ती अशक्य असल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिलं होतं. मात्र इतर सदस्यांनी लोकपालची शिफारस राष्ट्रपतींकडे करावी, यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही, असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलं. कॉमन कॉज या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला होता. लोकपाल नियुक्तीतील नेमका अडथळा काय? लोकपाल, लोकायुक्त विधेयक 2013 मध्ये लोकपाल नियुक्तीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याची तरतूद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समितीचे अध्यक्ष असतील, तर लोकसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश समितीचे सदस्य असतील. केंद्रात एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेता नाही. त्यामुळे कायद्यात बदल केल्याशिवाय लोकपाल नियुक्ती शक्य नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं होतं. लोकसभेत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने लोकसभेत विरोधी पक्ष नेता नाही. काँग्रेसचे लोकसभेत 45 सदस्य आहेत, तर 55 सदस्यांची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget