एक्स्प्लोर
आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा

नवी दिल्ली : भाजपने दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा फडकावला आहे. पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिल्ली या तीन महापालिकांच्या 270 जागांपैकी भाजपने 181 जागांवर विजय मिळवला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'आप' दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आपने तीन महापालिकांमध्ये मिळून 48 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला केवळ 30 जागांवर समाधान मानावं लागलं. सत्ताधारी आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मोदी लाट नव्हे, ईव्हीएम लाट : आप पराभवानंतर आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन भाजपला लक्ष्य केलं. दिल्लीतील ही मोदी लाट नाही, तर ईव्हीएम लाट आहे, असा आरोप आपने केला. भाजपला 2009 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी ईव्हीएमवर संशोधन केलं आहे. त्याच बळावर ते निवडणुका जिंकत आहेत, असा घणाघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला. दरम्यान 2015 साली केजरीवाल यांनी याच ईव्हीएमने विजय मिळवला होता, असं प्रत्युत्तरही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिलं. भाजपला कौल दिल्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या जनतेचे आभारही मानले. दिल्लीतील पराभवानंतर दिल्लीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. मात्र यश न मिळाल्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारुन त्यांनी राजीनामा दिला. दक्षिण दिल्ली महापालिका :
- भाजप-70
- काँग्रेस-12
- आप-16
- इतर-6
- एकूण - 104
- भाजप- 64
- काँग्रेस-15
- आप-21
- इतर- 3
- एकूण -103
- भाजप-47
- काँग्रेस-3
- आप-11
- इतर-2
- एकूण-63
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























