Mangalyaan : अखेर 'मिशन मंगळयान' चा The End; इस्रोकडून दुजोरा
मंगळयानाची बॅटरी संपण्याचे मुख्य कारण हे ग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इस्रोने मंगळयान वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु मंगळ ग्रहावर सातत्यानं ग्रहणं निर्माण होतं होती.
मुंबई : मंगळ ग्रहाची माहिती घेण्यासाठी भारताने अंतराळात पाठवलेल्या मंगळयान मोहिम (Mission Mangal) तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ही मोहिम संपुष्टात आली आहे. ही माहिती इस्रोने (ISRO) माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. मंगळावर थेट एकाच वेळी पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
गेल्या आठ वर्षापासून अंतराळात असलेल्या मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपल्यानं ही मोहिम संपली आहे. मंगळयानातील इंधन संपलं होते. तसेच त्याची बॅटरीही पूर्णपणे निकामी झाली आहे. मंगळयानाशी असलेला संपर्क तुटला आहे. मात्र इस्रोच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या विषयी माहिती दिली नाही.
Mars Orbiter craft non-recoverable, Mangalyaan mission over, confirms ISRO
— Press Trust of India (@PTI_News) October 3, 2022
मंगळयानाची बॅटरी संपण्याचे मुख्य कारण हे मंगळ ग्रहण असल्याचे सांगितले जात आहे. तसेच इस्रोने मंगळयान वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु मंगळ ग्रहावर सातत्यानं ग्रहणं निर्माण होतं होती. सर्वात मोठं ग्रहण साडे सात तासांच होतं. त्यामुळे मंगळयानाची बॅटरी संपली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळयानाची बॅटरी ही सूर्यप्रकाश नसेल तर एक तास 40 मिनिटं कार्यरत राहिल या पद्धतीने बनवण्यात आली होती. मात्र ग्रहण हे साडेसात तासाचे असल्याने बॅटरी पूर्ण संपली होती.
मंगळयान मिशन हे 2013 साली सुरू करण्यात आले होते. या मोहिमेसाठी साडे चारशे कोटी खर्च करण्यात आला होता. मंगळयान मोहिमेला मार्स ऑर्बिटर मिशन असे देखील बोलले जाते. 5 नोव्हेंबर 2013 ला लाँच केलं होतं. ते 24 सप्टेंबर 2014 ला मंगळाच्या कक्षेत पोहोचलं होतं.
मंगळयानाने त्याच्या निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा 16 पट अधिक काम केले. मंगळयानाच्या मार्स कलर कॅमेऱ्याने 1 हजार 100 हून अधिक फोटो काढले. ज्यामुळे मार्स एटलस तयार झाला. या मोहिमेमुळे मंगळ ग्रहावर 35 हून अधिक रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
India At 2047: भविष्यातील इस्रोच्या अंतराळ मोहिमा, जाणून घ्या भारत अवकाशात कसे वर्चस्व गाजवेल
आदित्य L-1 ते चंद्रयान, गगनयान, शुक्रयान... इस्त्रोच्या भविष्यातील अंतराळ मोहिमा कशा आहेत?