एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

रॉबर्ट वाड्रांची मॅरेथॉन चौकशी, 9 तासात 40 प्रश्नांची सरबत्ती

लंडनमधील अनधिकृत संपत्ती खरेदीचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुरावे सोबत घेऊन 40 प्रश्नांचा भडीमार केला. दिवसभर रॉबर्ट वाड्रा यांची कसून चौकशी करण्यात आली.

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगप्रकरणी प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून आजही मॅरेथॉन चौकशी करण्यात आली.  9 तास चाललेल्या या चौकशीनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना घरी घेऊन जाण्यासाठी स्वतः ईडी कार्यालयात आल्या. लंडनमधील अनधिकृत संपत्ती खरेदीचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुरावे सोबत घेऊन 40 प्रश्नांचा भडीमार केला. दिवसभर रॉबर्ट वाड्रा यांची कसून चौकशी करण्यात आली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रांना आज पुन्हा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावे लागले. त्यांची आज सकाळी 11.20 पासून ईडीच्या मुख्यालयात चौकशी सुरु झाली. बेहिशेबी मालमत्ता आणि लंडनमधील अवैध संपत्ती खरेदीप्रकरणी वाड्रा यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आज वाड्रा यांची 2010 साली लंडनहून सुमीत चड्डा नावाच्या व्यक्तीनं पाठवलेल्या मेलवर चौकशी झाली.  त्या मेलमध्ये लंडनमधील संपत्तीच्या नूतनीकरणाचा उल्लेख होता. सुमीत चड्डा हे आर्म्स डीलर संजय भंडारी यांचा चुलत भाऊ आहे. तरी, डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं काल वाड्रा यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, सुमीत चड्डा यांच्या 2010 सालच्या मेलवर आज ईडीकडून 40 प्रश्न वाड्रांना विचारले गेल्याची माहिती आहे. काल ईडीसमोर वाड्रा यांची 6 तास चौकशी चालली होती. दरम्यान दुपारी त्यांना लंचब्रेक देण्यात आला होता.  दुसरीकडे हा तपास गोपनीय असून तपासातील माहिती उघड होत असल्याचा आरोप वाड्रांच्या वकीलांनी केला होता. काल ईडीनं 6 तास चौकशी केली काल मनी लॉड्रिंगप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांची अमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं 6 तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान वाड्रा यांना 36 प्रश्न ईडीकडून विचारण्यात आले होते. सोबतच वाड्रांना ईमेल आणि कागदपत्रांची विचारणा केली गेली तसेच अनेक व्यक्तींची नावं घेण्यात आली होती. वाड्रांनी ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आरोप फेटाळून लावले होते. लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मनोज अरोरा स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीचा माजी कर्मचारी आहे. वड्रा यांच्याशी संबंधित या कंपनीने 2008 मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 3.5 एकर जमीन 7.50 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन 58 कोटी रुपयांना विकली आणि 509 कोटी रुपये नफा कमाविला, अशी नोंद एफआयआरमध्ये आहे. आपण मनोज अरोराला ओळखत असलो तरी त्याने आपल्यासाठी काही ई-मेल लिहिले नसल्याचं रॉबर्ट वाड्रा यांनी काल सांगितलं होतं. काल रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयात आले, तेव्हा त्यांच्या पत्नी प्रियांका गांधीदेखील सोबत आल्या होत्या. दरम्यान, वाड्रा यांना मनी लाँड्रिंगप्रकरणात दिल्ली कोर्टाकडून 16 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवाय मनी लाँड्रिंग हा प्रकार गंभीर असून वाड्रा यांनी तपास अधिकाऱ्यांना याप्रकरणी सहकार्य करावं, असा आदेश कोर्टाने दिला होता. काय आहे प्रकरण ? शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रांवर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज आरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये अर्थिक देवाण-घेवाण आणि लंडनमधील घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 19 पाउंड म्हणजे म्हणजे 19 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार ऑक्टोबर 2009 मध्ये करण्यात आला असून जून 2010 मध्ये याची विक्री करण्यात आली. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले होते. वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित असलेल्या तीन अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई विदेशात जमवलेल्या संपत्तीच्या चौकशी संबंधित होती. त्याचबरोबर सुरक्षा सामग्रीच्या खरेदीत काही संशयिताना दलाली मिळाल्याच्या चौकशीबाबत ही झडती घेतली गेली. वाड्रा यांच्या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांच्या दिल्ली, नोएडा, सुखदेव विहार आणि जयपूर या परिसरात ही छापेमारी करण्यात आली होती. कोणत्याही सर्च वॉरंटशिवाय ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली. कायदा आणि घटनेचा अवमान करत ईडीने वाड्रा यांच्यावर ही कारवाई केली असल्याच्या आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget