एक्स्प्लोर
मनोहर पर्रिकरांचं गोव्यात ‘मुख्यमंत्री’ म्हणून कमबॅक
पणजी (गोवा) : गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रिकर यांचं नाव निश्चित झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. यावेळी मनोहर पर्रिकरही उपस्थित होते.
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रिकर यांची निवड व्हावी, यासाठी भाजपच्या संसदीय मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे मनोहर पर्रिकरांचं गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी कमबॅक निश्चित झालं आहे.
https://twitter.com/nitin_gadkari/status/840950722837512192
मनोहर पर्रिकर घटनेनुसार गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षणंत्रिपदाचा राजीनामा देतील, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या अटीवर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि 2 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजप आणि इतर पक्षांचे मिळून एकूण 21 आमदारांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement