एक्स्प्लोर
‘पत्नीला शोधून आणणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस’, युवकाची पोस्ट फेसबुकवर व्हायरल
आग्रा: आग्रामधील जगदीशपुरा येथील एका युवकाची पत्नी मागील सात महिन्यांपासून गायब आहे. याप्रकरणी युवकानं आपल्या शेजाऱ्याविरोधात तक्रारही दाखल केली आहे. पण त्या तक्रारीवर पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानं युवकानं एक नामी शक्कल लढवली. पत्नीला शोधून काढणाऱ्या व्यक्तीला 1 लाखांचे बक्षीस दिलं जाईल अशी पोस्ट त्यानं फेसबुकवर टाकली आहे. त्याची ही पोस्ट अनेक जण शेअर करीत आहेत.
अंकित गर्ग याचं लग्न आठ वर्षापूर्वी ज्योती गर्ग हिच्याशी झालं होतं. त्यांना दोन मुलंही आहे. लग्नानंतर सारं काही आनंदात सुरु होतं. पण काही महिन्यांपूर्वीच ज्योतिचं शेजारी फ्लॅटमध्ये राहणाऱ्या सनी नावाच्या मुलाशी सूत जुळलं. त्यानंतर मागील सात महिन्यांपूर्वी ज्योती घरातून अचानक गायब झाली. तर सनीही तेव्हापासून गायब आहे.
त्यानंतर अंकितनं याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. दरम्यान, पोलिसांनी सनीला शोधून काढलं. पण आपण अंकिताला गायब केलं नसल्याचं सांगितल्यानंतर पोलिसांनी सनीला सोडून दिलं.
पोलिसांनी या प्रकरणाकडे फारसं लक्ष न दिल्यानं अंकित हताश झाला आणि थेट सोशल मीडियावर आपल्या पत्नीचा फोटो पोस्ट करुन तिला शोधून आणणाऱ्या व्यक्तीला एक लाखाचं बक्षीस देऊ असं जाहीर केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement