एक्स्प्लोर
मित्राच्या आईशी अफेअर, शेजाऱ्यांची प्रेमी युगुलाला मारहाण
तक्रारदार विजयजी ठाकोर याचे मित्र विरामजी ठाकोरची आई संजनाबेन हिच्याशी प्रेमसंबंध आहेत.

अहमदाबाद : मित्राच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या तरुणाला चौघा शेजाऱ्यांनी मारहाण केली. गुजरातमधील कालोल तालुक्यात ही घटना घडली असून विजयजी ठाकोर याने चौघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार विजयजी ठाकोर याचे मित्र विरामजी ठाकोरची आई संजनाबेन हिच्याशी प्रेमसंबंध आहेत. विजयजी संजनाबेनला भेटायला गेला होता. त्यावेळी मित्र विरामजी घरी नव्हता. त्यामुळे शेजारी राहणारे जगजी शंकाजी ठाकोर, नेनाजी शंकाजी ठाकोर, अर्जनजी शंकाजी ठाकोर, माथुरजी ठाकोर संजनाबेनच्या घरी गेले आणि मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या घरी येण्याचं कारण विजयजीला विचारु लागले. संजनाबेनसोबत आपले प्रेमसंबंध असल्याचं विजयजीने सांगताच चौघांचा पारा चढला आणि त्यांनी दोघांना काठीने मारहाण केली. 'टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. मारहाणीत जखमी झालेले विजयजी ठाकोर आणि संजनाबेन ठाकोर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कालोल तालुका पोलिसात चौघा शेजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















