एक्स्प्लोर
बलात्कारानंतर युवकाने महिलेला पेटवलं, महिलेने कवटाळल्याने आरोपीचाच मृत्यू
संबंधित विधवा महिला घरी एकटीच असताना 35 वर्षीय तरुण तिच्या घरात घुसला. 'तरुणाने आपल्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर पेटवून दिलं', असा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बलात्कार पीडितेला आरोपीने पेटवलं, त्याच क्षणी महिलेने आरोपीला कवटाळल्याने त्याचाच होरपळून मृत्यू झाला. तर जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बलात्कार करुन महिलेला पेटवणाऱ्या तरुणालाच स्वतःच्या कर्माची शिक्षा मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
प. बंगालमधील मालदा जिल्ह्यात सोमवारी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती आहे. संबंधित विधवा महिला घरी एकटीच असताना 35 वर्षीय तरुण तिच्या घरात घुसला. 'तरुणाने आपल्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर पेटवून दिलं', असा आरोप पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबानीत केला आहे.
आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या अवस्थेतच महिलेने आरोपी तरुणाला घट्ट कवटाळलं. घरातून धूर येत असल्याचं शेजाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी घरात शिरकाव केला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये आरोपीचा होरपळून मृत्यू झाला, तर महिलेवर उपचार सुरु आहेत.
पोलिसांना पीडितेच्या घरात केरोसीन आढळलं आहे. आरोपीचं घर पीडितेच्या घरापासून 35 किलोमीटर दूर असताना तो तिथे कसा आला, याचा शोधही पोलिस घेत आहेत. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं पीडितेच्या घरी वारंवार येणं-जाणं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement