एक्स्प्लोर

Mahatma Gandhi Death Anniversary : बापूंचे हे दहा विचार वाचा, तुम्हाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतील

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या विचारांनी आजही त्यांना भारतीय जनमानसात जिवंत ठेवलं आहे. आज गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे महत्वाचे दहा विचार काय आहेत ते जाणून घेऊया. 

Mahatma Gandhi Death Anniversary  :  देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी (Mahatma Gandhi Death Anniversary) नथुराम गोडसेंनं  महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या केली त्या घटनेला आज 76 वर्ष झाले आहे.  सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन व्यतित करणाऱ्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान असलेल्या महात्मा गांधी यांची आजच्याच तारखेला नथुराम गोडसेनं हत्या केली होती. गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. अहिंसेच्या मार्गाने ब्रिटीशांची सत्ता उलथवून टाकण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देश सर्वात मोठ्या अहिंसेच्या पुजाऱ्याला विनम्र आदरांजली वाहत आहे.  'माझं जीवन हाच माझा संदेश आहे' असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचे जीवन खरंच एक मोठा संदेश आहे. गांधी शरीराने संपले असले तरी त्यांचे विचार आजही त्यांना जिवंत ठेवतात.

जगातला असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या जीवनाला गांधीवादाने कधीच स्पर्श केला नसेल. महात्मा गांधीनी आपल्या विचारातून आणि कृतीतून आयुष्यभर सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांचा संदेश दिला.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या महत्वाच्या दहा विचारांवर एक नजर टाकूयात. 

1. जगात बदल घडवायचा असेल तर तो बदल प्रथम स्वत:मध्ये घडवा.

2. दुर्बल व्यक्ती कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवान व्यक्तीचा गुणधर्म आहे. 

3. मानवतावादावरचा विश्वास ढळू देऊ नका. मानवतावाद हा अथांग समुद्र आहे. या समुद्रातील काही थेंब प्रदूषित असू शकतात, पण त्यामुळे सर्व समुद्र प्रदूषित होऊ शकत नाही. 

4. प्रतिशोध हा असा गुण आहे जो जगाला आंधळा बनवतो. 

5. अगदी सभ्य मार्गानेही तुम्ही जगाला हादरवून सोडू शकता. 

6. थोडासा संयम हा हजारो उपदेशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. 

7. एखाद्या देशाच्या सभ्यपणाची परीक्षा घ्यायची असेल तर त्या देशात प्राण्यांना कशी वागणूक दिली जाते ते पहा. 

8. मनुष्य हा त्याच्या स्वत:च्या विचारांची निर्मिती आहे. तो कसा विचार करतो त्याचप्रमाणे त्याचं चारित्र्य ठरतं. 

9. आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपलं समाधान अवलंबून आहे. 

10. हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरतं असतं. पण त्यामुळे होणारं नुकसान मात्र दीर्घकालीन असतं.

संबंधित बातम्या : 

Mahatma Gandhi Death Anniversary :  बापूंचे हे दहा विचार वाचा, तुम्हाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 PmVidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget