Maharashtra Weather Update : राज्यात आजही वादळी पावसाचा इशारा, ओडिशात वीज कोसळून 9 जणांचा अंत, राजस्थानला सूर्य कोपला; पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस राहणार आहे. 20 21 आणि 22 मे रोजी कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील आठवडाभर (Maharashtra Weather Update) पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 व 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या अंदाजामुळे केरळ तसेच महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन लवकर होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, देशामध्ये काही ठिकाणी अजूनही गर्मीचा प्रकोप सुरूच आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे तापमानाने 45 अंश डिग्री गाठले. त्यामुळे तिथं उष्णतेचा तडाका सुरू आहे. दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यात देखील पाऊस राहणार आहे. 20 21 आणि 22 मे रोजी कोकण गोवा दक्षिण मध्य महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशभरात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
दुसरीकडे, उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाम, बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रात देखील हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. सर्व भागातून येत असलेले आद्रतायुक्त वारे आणि दुपारपर्यंत उन्हामुळे निर्माण झालेले बाष्प यांच्या संयोगातून राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्किम, आसाम या राज्यामध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. पश्चिम किनारपट्टी, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये विजांच्या कडकडासह पावसाचा पावसाची नोंद झाली.
शुक्रवारी वीज पडल्याने 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी देशातील 24 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील काही भागातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार-ओडिशातही दमट परिस्थिती निर्माण होऊ शकते. ओडिशात पाऊस आणि तीव्र उष्णतेने कहर केला आहे. शुक्रवारी वीज पडल्याने 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला. काही लोक भाजलेही आहेत. घटनेच्या वेळी यातील बहुतेक लोक शेतात काम करत होते.
पुढील दोन दिवस हवामान अपडेट
18 मे : अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, मेघालयात वादळाचा इशारा देण्यात आला आहे. गोवा, महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जोरदार वादळही येऊ शकते. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळ आणि वादळे येतील.
9 मे : मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळे आणि वादळे येतील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार वादळे देखील येऊ शकतात. अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालयात वादळाचा इशारा देण्यात आला आहे. गोवा आणि महाराष्ट्रात हलका पाऊस पडू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या























