एक्स्प्लोर

विनयभंगात महाराष्ट्र अव्वल, वर्षभरात 11,713 विनयभंग!

नवी दिल्ली : महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याचा आरोप होत असतानाच आता एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानेही या आरोपावर शिक्कामोर्तब केला आहे. महिलावंर सर्वात जास्त अत्याचार होणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. एनसीआरबीने 2015 चा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल मंगळवारी जाहीर केला.   उत्तर प्रदेशमध्ये 2015 या वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या एकूण 35 हजार 527 घटना घडल्या. हा आकडा देशातील एकूण गुन्ह्यांच्या 10.9 टक्के एवढी आहे. उत्तर प्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.   विनयभंगाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात!   2015 मध्ये देशभरात विनयभंगाच्या सर्वात जास्त घटना घडल्या आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार, महिला विनयभंगाचा आकडा 82 हजार 422 एवढा आहे. धक्कादायक म्हणजे विनयभंगाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. महाराष्ट्रात एकूण 11 हजार 713 घटनांची नोंद झाली आहे, तर त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचा (8,049 घटना) क्रमांक लागतो.   सर्वात जास्त महिला अत्याचाराच्या घटना या’ तीन राज्यांमध्ये! उत्तर प्रदेश – 35,527 घटना पश्चिम बंगाल – 33,218 घटना महाराष्ट्र – 31,126 घटना   केंद्रशासित राज्यांमध्ये महिला अत्याचारांत घट   केंद्रशासित राज्यांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येनं घटल्याचं एनसीआरबीच्या 2015 च्या अहवालातून समोर आले आहे. लक्षद्विपमध्ये महिला अत्याचाराच्या 9 घटना घडल्या आहेत. केंद्रशासित राज्यांमध्ये 2014 साली महिला अत्याचाराच्या घटनांची 3.37 लाख एवढी नोंद केली गेली होती. या संख्येत घट झाली असून, 2015 साली 3.27 लाख घटनांची नोंद झाली आहे.   बलात्काराच्या घटना :   2015 या वर्षात देशात एकूण 34 हजार 651 बलात्काराच्या घटना घडल्या. 2014 साली 36 हजार 735 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.   सर्वात जास्त बलात्काराच्या घटना या’ तीन राज्यांमध्ये! मध्य प्रदेश -  4,391 घटना महाराष्ट्र – 4,144 घटना राजस्थान – 3,644 घटना उत्तर प्रदेश – 3,025 घटना   चिमुकल्यांवरील अत्याचार :   एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2015 या वर्षात POCSO अंतर्गत लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या एकूण 8 हजार 800 घटनांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 3,149 घटनांमध्ये आरोपी हे पीडिताच्या शेजारच्या घरातील असल्याचे आढळले आहेत. तर 10 टक्के आरोपी हे पीडित चिमुकल्यांचे नातेवाईक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.   एनसीआरबी म्हणजे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2015 च्या अहवालानंतर देशातील गुन्हेगारीचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. विशेषत: महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण विशेष लक्षणीय आहे. याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचीही गरज आहे. महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले असून, विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे.   महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे आरोप विरोधकांकडून वारंवार होत असताना, राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा 2015 चा अहवाल गृहखात्याचे डोळे उघडणारा आहे. त्यामुळे या अहवालाकडे राज्य सरकार किती गांभीर्यानं पाहतं आहे आणि त्याप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी कसे पावले उचलत आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Embed widget