एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 14 August 2022 : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 14 August 2022 : राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

फाळणी दिवस -
14 ऑगस्ट याच दिवशी अखंड भारताचे दोन तुकडे झाले. ही वेदना लक्षात घेऊन दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी दिन म्हणून स्मरणात ठेवला जाईल. देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी हा विशेष दिवस साजरा केला जाणार आहे.

राष्ट्रपती देशाला संबोधित करणार - 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु 76व्या स्वातंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सात वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. सायंकाळी सात वाजता आकाशवाणीवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार आहे. 

मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड मॅरेथॉन - 
मुंबई पोलीस आयोजित आजादी की दौड, ही मॅरेथॉन दौड रविवारी सकाळी 6-10 आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 

 

मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक 
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी बैठक बोलवली आहे. रविवारी दुपारी 12 वाजता, सह्याद्री अतिथीगृहलर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला राज्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक,  मराठा नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

15 ऑगस्ट पूर्वी खाते वाटप होणार – सत्तार
9 ऑगस्टला शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज सहा दिवसानंतरही मंत्री पदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खाते वाटप नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी 14 पर्यंत खाते वाटप होईल असं सांगितलं आहे. 

मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री सहभागी होणार -
मालाड येथे होणाऱ्या तिरंगा यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर सहभागी होणार आहेत. यावेळी साधारण 15,000 नागरिक सवा की.मी. चा अखंड ध्वज घेऊन सामील होणार आहेत, सकाळी 8.45 वाजता, मालाड (पश्चिम), नटराज मार्केट, शिव मंदिर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे. 

काँग्रेसकडून आझादी की गौरव यात्रा  -
काँग्रेसकडून आझादी की गौरव यात्रा काढली जाणार आहे. याला वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी नेते उपस्थित रहाणार आहेत, सकाळी 10 वाजता, प्रभाकर रेस्टॉरंट येथून पुढे महात्मा ज्योतिबा फुले मार्ग, हिंदमाता,  फाळके रोड, मुंबई मराठी ग्रंथ सग्रहाल मार्गा वरून दादर स्टेशन यात्रा अशी असणार आहे.

कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा - 
मुंबई – मुंबईतील कामाठीपुरा आता वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. इथे महापालिकेच्या ई विभागाकडून एक अनोखा उपक्रम राबवला जातोय. कामाठीपुरात स्वच्छतेची स्पर्धा भरवली जातेय. ज्या महिलेचं घरं सर्वाधिक स्वच्छ आणि आरोग्यदायी त्यांना पालिकेकडून विशेष पुरस्कारही दिला जाणार आहे.  
 
गणपती बाप्पाचे रौप्य महोत्सव  -
 मुंबई – भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव आणि कला दिग्दर्शक अतुल खुळे यांच्या गणपती बाप्पाचे रौप्य महोत्सव यानिमित्त 25 गणपतींची आरास करायचा निश्चय केलाय. त्यासाठी 25 कलात्मक दृष्टी लाभलेले कलाकार त्यांच्या पध्दतीने 25 गणेश मूर्ती साकारणार, आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आकार असतो. या ठिकाणी अच्युत पालव, दिग्दर्शक प्रमोद पवार इत्यादी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.  

यमुना नदी प्रवाहाबाहेर - 
मुसळधार पावसामुळे यमुना नदीला पूर येण्याची शक्यता आहे. परिसरात संततधार पाऊस कोसळत राहिल्यास यमुना नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. शनिवारी यमुना नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत होती. यमुना नदीच्या काटावर वसणाऱ्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 13 हजार पेक्षा जास्त लोकांचं आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे.  

20:26 PM (IST)  •  14 Aug 2022

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव शहरातील सोसायटीत भीषण आग 

गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव शहरातील बेला रेसिडेन्सी नावाच्या सोसायटीच्या 10 व्या मजल्यावर  भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आहे. अपार्टमेंटमधील लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून ही आग इमारतीच्या दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली आहे. उंबरगाव नगरपालिकेच्या गांधी वाडीजवळील बेला रेसिडेन्सी संकुलातील 10 मजली अपार्टमेंटमध्ये ही भीषण आग लागली आहे. 

16:57 PM (IST)  •  14 Aug 2022

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खाते दण्यात आले आहे. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता,  दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्री, उदय सामंत यांच्याकडे उद्योग मंत्रालय, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आणि कुटुंब कल्याण, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वने आणि सांस्कृतीक कार्य, अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आलंय.  

राधाकृष्ण विखे-पाटील

 महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार 

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील 

 उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित 

 आदिवासी विकास

गिरीष महाजन 

 ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

गुलाबराव पाटील 

 पाणीपुरवठा व स्वच्छता 

 दादा भुसे 

 बंदरे व खनिकर्म 

संजय राठोड 

 अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे 

 कामगार

 संदीपान भुमरे 

 रोजगार हमी योजना व फलोत्पादन

 उदय सामंत 

 उद्योग

 प्रा.तानाजी सावंत 

 सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण 

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार 

कृषी

दीपक केसरकर 

शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे 

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई 

 राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा 

 पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

14:46 PM (IST)  •  14 Aug 2022

वाशिम : मंत्री संजय राठोड पोहरादेवीमध्ये दाखल..

मंत्री संजय राठोड पोहरादेवीमध्ये दाखल झाले आहेत. पोहरादेवी येथे धर्म परिषद पार पडणार आहे. पोहरादेवी येथे बंजारा बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. बंजारा वेशभूषा घालून महिलांनी जागोजागी लेंगी नृत्य सादर केलं. बंजारा समाजाचे राज्यभरातील कारभारी आणि नायक यांची ही या ठिकाणी उपस्थिती आहे. धर्म परिषदेसाठी राज्यभरातून बंजारा समाजाच्या नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. 

14:12 PM (IST)  •  14 Aug 2022

सिंधुदुर्ग : आंबोलीत मोठी वाहतूक कोंडी

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विकेंड असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी आंबोलीत आल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालीय. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर दोन्ही बाजूंनी मोठी वाहतूक कोंडी दिसत आहे. वाहतूक कोंडीमुळे आंबोली घाटातून येजा करणाऱ्या वाहनचालकांना फटका बसत आहे.

13:35 PM (IST)  •  14 Aug 2022

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर चार चाकीने घेतला पेट

पुणे सातारा रस्त्यावर कात्रजच्या नवीन बोगद्यामध्ये चार चाकी गाडीने पेट घेतला. काही वेळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. धुरामुळे काही वेळ काही दिसत नव्हते. अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊ आग विझवली आहे. यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्वेनगर येथील चार जण या गाडीतून साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत होतो. कात्रज बोगद्यात गाडी गेल्यानंतर गाडीत असलेल्या प्रवाशांना इंजिन मधून धूर येतो आहे, असे दिसतात त्यांनी तात्काळ गाडीतून बाहेर पडत अग्निशमन दलाला बोलवले. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget