त्या सुंदर साध्वीचं एका रात्रीत नशीब पालटलं, भारतभरात फेमस, इन्स्टाग्रामवर काही तासांत 1 मिलियन फॉलोवर्स!
Mahakumbh Viral Sadhvi : महाकुंभातील त्या सुंदर तरुणीची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. तिचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल होत आहेत.
प्रयागराज : जगभरात चर्चा असलेल्या उत्तर प्रदेशमधील महाकुंभाच्या पर्वाला 13 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. येत्या 26 फेब्रुवारीपर्यंत महाकुंभ चालू असेल. या काळात भारतासह जगभरातील भक्त, साधूसंत त्रिवेणीसंगमावर पवित्र स्नान करतील. दरम्यान, याच महाकुंभादरम्यान सध्या एका सुंदर तरुणीची चर्चा चालू आहे. ही तरुणी स्वत:ला साध्वी असल्याचं सांगत आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याच काही सेकंदांच्या व्हिडीओने तिचं नशीब बदलून टाकलं आहे. काही तासांत तिच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सने एक मिलिनय म्हणजेच दहा लाखांचा टप्पा पार केला आहे.
सुंदर दिसणारी तरुणी नेमकी कोण आहे?
महाकुंभाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत एक सुंदर तरुणी स्वत: 30 वर्षांची असल्याचं सांगताना दिसतेय. तसेच गेल्या दोन वर्षांप्रमाणे एका साध्वीप्रमाणे मी जीवन जगत आहे, असंदेखील ती सांगत आहे. या तरुणीचं खरं नाव हर्षा रिछारिया असं आहे. मी याआधी अँकरिंग केली आहे. सोबतच मी अभिनय वगैरे केले असून आता मी साध्वीचे जीवन जगत आहे, असं तिने या व्हिडीओत सांगितलं आहे. ही तरुणी एवढी सुंदर असूनही ती एखाद्या साध्वीप्रमाणे जीवन जगत असल्याचे समोर आल्यानंतर तिची सगळीकडे एकच चर्चा चालू आहे.
View this post on Instagram
तिला साध्वी कसं म्हणावं?
ही तरुणी व्हायरल झाल्यानंतर ती साध्वी असल्याच्या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ती इन्स्टाग्राम तसेच इतर सोशल मीडियावर सक्रिय असते. इन्स्टाग्रावर तर तिला अनेक लोक फॉलो करतात. असे असताना तिला साध्वी कसं म्हणावं, असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे. इन्स्टाग्रामवरील बायोनुसार ही तरुणी आचार्य महामण्डलेश्वर स्वामी श्री कैलाशानंदगिरी महाराज यांची शिष्या आहे.
काही तासांत तरुणीचं नशीब पालटलं
दरम्यान ही तरुणीन साध्वी आहे की नाही याबाबत मतमतांतरं आहेत. मात्र काही सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओने या तरुणीचं नशीब मात्र पालटलं आहे. ती काही तासांत संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे. प्रकाशझोतात येण्याआधी इन्स्टाग्रामवर तिचे साडे सहा लाख फॉलोअर्स होते. मात्र महाकुंभमेळ्यातील तिचे वेगवेगळे व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिचे इन्स्टाग्राम खाते सर्च करून तिला फॉलो करण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून या तरुणीचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स अवघ्या एका रात्रीत एक मिलनियमच्या पुढे गेले आहेत. म्हणजेच अवघ्या काही तासांत या तरुणीला जवळपास चार लाखपेक्षा जास्त लोकांनी इन्स्टाग्रावर फॉलो केलं आहे.
View this post on Instagram
तरुणीचं नशीब पालटलं
सोशल मीडियावर प्रसिद्ध होणं साधी गोष्ट नाही. त्यासाठी आजघडीला अनेक तरुण-तरुणी जीवाचं रान करत आहेत. मात्र हर्षा रिछारिया या तरुणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने ती सध्या सोशल मीडियावर स्टार झाली आहे. त्यामुळेच तिचं नशीब पालटल्याचं म्हटलं जातंय.
हेही वाचा :