एक्स्प्लोर

Maha Kumbh Stampede : संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडा, महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथांचं आवाहन,अखिलेश यादव म्हणाले...

Maha Kumbh 2025 : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. योगी आदित्यनाथ अन् अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.   

Maha Kumbh Stampede प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये मध्यरात्री (29 जानेवारी)  एक वाजताच्य सुमारास चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची तर 50 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर योगी आदित्यनाथ आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. योगी आदित्यनाथांनी भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे. गंगा नदीच्या ज्या घाटाजवळ असाल तिथं स्नान करा, संगम घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करु नका, असं देखील आवाहन योगी आदित्यनाथांनी केलं.  

योगी आदित्यनाथ म्हणाले की स्नानासाठी अनेक घाट बनवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाविकांना प्रशासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचं आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं.  याशिवाय अफवांवर विश्वास ठेवू नका,असं देखील ते म्हणाले.  कुंभमेळा अधिकारी विजय किरण यादव यांनी देखील योगी आदित्यनाथांना माहिती दिली आहे.  

संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडा

योगी आदित्यनाथ आणि सर्व धर्मगुरुंनी देखील भाविकांना आवाहन केलं आहे. स्वामी रामभद्राचार्य यांनी महाकुंभमध्ये येणाऱ्या भाविकांनी संगमावर स्नान करण्यात आग्रह सोडावा असं आवाहन केलं. तुमच्यापासून जो घाट जवळ असेल तिथं स्नान करावं, असं त्यांनी म्हटलं. लोकांनी आपल्या शिबिरातून बाहेर पडू नये, एकमेकांची सुरक्षा करावी अन् अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे.  


समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेनंतर महाकुंभमेळ्यातील नियोजनातील अव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरलं. भाविकांच्या मृत्यूची बातमी दु:खद आहे, ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली, असं ते म्हणाले. अखिलेश यादव यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत, ज्यामध्ये गंभीर जखमींना एअर अॅम्ब्युलन्स द्वारे चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यात यावं. मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा. जे लोक हरवले आहेत त्यांना पुन्हा त्यांच्यासोबतच्या लोकांसोबत भेटण्यासाठी मदत करा. हेलिकॉप्टरचा चांगला वापर करा. सतयुगापासून सुरु असलेल्या शाही स्नानाच्या अखंड आणि अमृत परंपरांना पाहता सुरक्षा व्यवस्था करुन मौनी अमावस्येचं शाही  स्नान पार पाडावं, असं अखिलेश यादव म्हणाले.  

इतर बातम्या : 

Kumbhmela 2025: कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी; मध्यरात्री 1 वाजता प्रयागराजमध्ये काय घडलं?

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास
US Iran War : इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
इराणसोबत चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन फिरवला, 40 मिनिटे चर्चा, मेगा प्लॅन सांगितला
Salary Increment : दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
दोन वर्षे काम करून फक्त 9 रुपयांची पगारवाढ; नोकरी सोडली तर 1.5 लाख दंड, सॉफ्टवेअर इंजिनिअरची व्यथा
Loksabha : लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर
लोकसभेतील खासदारांची संख्या 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK Vs KKR : कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा दुसरा विजय, CSK नं सांघिक कामगिरीच्या जोरावर KKR ला लोळवलं   
Donald Trump : अमेरिका इराण यांच्यातील तणाव कमी होणार? इराणसोबत दोन दिवसात चर्चा शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा दोन दिवसात शक्य, डोनाल्ड ट्रम्प यांनी ठिकाण सांगितलं
Gold Rate : सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
सोने उच्चांक गाठल्यानंतर 25000 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 143000 रुपयांची घसरण, सोने चांदीच्या दरांचं पुढं काय होणार?
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
वैभव सूर्यवंशी पुढच्या सामन्यात शतक करेल; शून्यावर बाद करणाऱ्या प्रफुल हिंगेच्या वडिलांकडून फलंदाजाचं कौतुक
Vaibhav Sooryavanshi : आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
दिग्गज गोलंदाजांची झोप उडवणारा वैभव सूर्यवंशी नाराज, टीम मॅनेजमेंटचा एक निर्णय खटकला, काय घडलं?
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
मोठी बातमी! अकोल्यात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा; सरकारकडून कारवाई, सक्तेच्या रजेवर
Praful Hinge: प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
प्रफुलला निळ्या जर्सीत, भारतासाठी खेळताना पाहायचंय; नागपुरात आई-वडिलांना अत्यानंद, सांगितलं दुखणं
Gautam Gambhir : गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
गौतम गंभीरला 2028 च्या टी 20 वर्ल्ड कपपर्यंत मुदतवाढीची आशा, सूर्यकुमार यादवची फॉर्मसाठी धडपड, कर्णधारपद राहणार की जाणार?
Embed widget