Madhya Pradesh: रतलाम पोलिसांची मोठी कारवाई, 50 लाखांचे अमली पदार्थ जप्त; अकोल्यातील माय-लेकांना अटक
Crime News: अकोल्यातील माय-लेकांना मध्य प्रदेशातून ड्रग्ज घेऊन येताना रतलाम पोलिसांनी अटक केली आहे. 50 लाखांचे अंमली पदार्थही त्यांच्याकडून जप्त केले गेले आहे.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील रतलाम पोलिसांनी एका महिलेसह दोन व्यापाऱ्यांना 505 ग्रॅम अमली पदार्थासह अटक केली आहे. अफझल खान (वय 24, रा. अकोटफैल, अकोला, महाराष्ट्र) आणि त्याची आई मल्लिका खातून (वय 55) असे आरोपींचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सुमारे 50 लाख रुपये आहे.
रतलाम स्टेशन रोड पोलीस स्टेशनचे अधिकारी किशोर पाटणवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एका बसमधून हिजाब घातलेली एक महिला आणि लांब केस असलेला एक व्यक्ती इंदूरच्या (Indore) दिशेने ड्रग्ज (Drugs) घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फव्वार चौक येथे बस अडवली. रतलामहून (Ratlam) इंदूरला जाणाऱ्या बसची झडती घेतल्यानंतर बसमधून दोघांना अटक केली.
आरोपी माय-लेक महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी असून ते मंदसौर येथून 505 ग्रॅम अमली पदार्थ घेऊन इंदूरमार्गे अकोला येथे जात होते. मात्र, मंगळवारी रात्री रतलाम पोलिसांनी त्यांना पकडले. अंमली पदार्थ घेऊन ते इंदूरहून अकोल्यात येत होते. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अर्धा किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ जप्त केले. एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
अधिक तपासादरम्यान, अफजलविरुद्ध अकोल्यातील अकोट फैल पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याची आई मल्लिका या परिसरात ड्रग्ज विकण्यासाठी ओळखली जाते, अशी माहिती समोर आल्याचे रतलाम पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून संबंधित नेटवर्कचा शोध सुरू
या तस्करांचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, हे पाहण्यासाठी पोलीस त्यांच्या लिंक जोडण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, अंमली पदार्थ तस्करांचे जाळे मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) महाराष्ट्रापर्यंत पसरले आहे. आता मंदसौरचा ड्रग्ज विक्रेता कोण आहे, जो इतर राज्यातही ड्रग्जचा पुरवठा करतो, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलीस मंदसौर आणि रतलाम येथून आणखी दोन आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणात अनेकांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मध्य प्रदेशच्या रतलाम पोलिसांनी आधीत मोठी कारवाई पार पाडली आहे. जांभळा हिजाब घातलेली एक महिला आणि पांढरा शर्ट घातलेला मुलगा MP 09 FA 8951 या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अंमली पदार्थ घेऊन अकोल्याला येत असलेल्या मायलेकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अन्य संबंधित तस्करांची माहिती घेत आहेत.
हेही वाचा: