एक्स्प्लोर

Madhya Pradesh BJP Clash Viral Video : मध्य प्रदेशमध्ये उमेदवारीवरून भाजपात राडा; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना धक्काबुक्की; पाहा व्हिडीओ

Madhya Pradesh BJP Clash : शिस्तबद्ध ओळखल्या जाणाऱ्या भाजपात उमेदवारीवरून मोठी नाराजी असल्याचे चित्र आहे. पक्षाचे मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

जबलपूर:  मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे (Madhya Pradesh Election 2023) राजकीय वातावरण तापले असताना आता दुसरीकडे पक्षांतर्गत नाराजी उफाळून येत आहे. शिस्तबद्ध ओळखल्या जाणाऱ्या भाजपात (BJP) उमेदवारीवरून मोठी नाराजी असल्याचे चित्र आहे. पक्षाचे मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांना त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. 

भाजपच्या जबलपूरमधील विभागीय कार्यालयात कार्यकर्त्यांनी निवडणूक तिकीट वाटपावरून गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. शहराच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिल्याने संतप्त झाले. तसेच त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सशस्त्र जवानालादेखील कार्यकर्ते जुमानले नाहीत, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. 

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णू शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी आणि आक्षेपार्ह टिप्पणीही करण्यात आली. मात्र, नंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले. भाजप कार्यालयात झालेल्या गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आज भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपली पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये जबलपूरच्या उत्तर मध्य विधानसभा मतदारसंघातून अभिलाष पांडे यांना उमेदवारी देण्यात आली. यानंतर माजी मंत्री शरद जैन यांचे संतप्त समर्थक, आता पक्षात परतलेले माजी बंडखोर नेते धीरज पात्रिया आणि नगरसेवक कमलेश अग्रवाल यांनी भाजपच्या विभागीय बैठकीत जबरदस्तीने प्रवेश केल्याचे सांगण्यात येते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घातला गेला. 


नाराज कार्यकर्त्यांचा तासभर गदारोळ

यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बैठकीत उपस्थित केंद्रीय मंत्री आणि मध्य प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनाही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे तासभर भाजपच्या विभागीय कार्यालयात गोंधळ सुरू होता. या दरम्यानच्या काळात शिवीगाळ झाल्याचेही सांगण्यात येत आहे. संतप्त असलेल्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की करत खाली पाडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, आपण संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढणार असून प्रसारमाध्यमे निघताच कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाईल. आपल्या गार्डसोबत हाणामारी झाल्याचाही त्यांनी इन्कार केला. त्याचवेळी नाराज कार्यकर्ता मनीष जैन यांनी या जागेवरून पक्षाने उमेदवार न बदलल्यास आम्ही निवडणुकीत काम करणार नाही, असे सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवादDevendra Fadnavis : दावोसमध्ये पहिल्या दिवशी 4 लाख 99 हजार कोटींचे करारSpecial Report Saif Ali Khan Discharge Home : सैफ घरी परतला, पण आरोपी भारतात कसा घुसला? A to Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Embed widget