एक्स्प्लोर
नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांमुळे तब्बल 45 जण लक्षाधीश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारांवर लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीसं देण्याची योजना घोषित केली होती. त्याचा निकाल जाहीर झाला आहे. कॅशलेस पेमेंटच्या माध्यमातून आतापर्यंत 45 जण लखपती झाले आहेत. सरकारकडून 25 डिसेंबरला ही योजना घोषित करण्यात आली होती. आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस दिली जाणार आहेत. एनसीपीआयच्या वेबसाईटवर यासंबंधीचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. ज्यात 15 भाग्यवान विजेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत, ज्यांना एक लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे. तसंच 614 विजेत्यांना 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलंय. 6500 विजेत्यांना प्रत्येक आठवड्याला 10 हजार रुपये देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर 15 हजार विजेत्यांना 1 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात आलं. ही बक्षीसाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जात आहे. कसा निवडला जातो लकी विजेता? एनसीपीआयमध्ये डिजिटल ट्रान्सफर करणाऱ्यांच्या ट्रॅन्झक्शन नंबरना रँडमली निवडलं जातं. या सर्व प्रक्रियेचं व्हिडीओ शूटिंगही केलं जातं. जेव्हा हा लकी ड्रॉ सुरु असतो, तेव्हा त्याठिकाणी ऑडिटर्सही उपस्थित असतात. एनसीपीआयच्य़ा अध्यक्षांनी सांगितलं की, 14 एप्रिलला सर्वात मोठं बक्षीस जाहीर करण्यात येईल. ज्यात 1 कोटी, 50 लाख आणि 25 लाखांचं रोख बक्षीस देण्यात येईल. तुम्हीही विजेते होऊ शकता 9 नोव्हेंबरनंतरची डिजिटल ट्रांन्झक्शन या लकी ड्रॉसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. मात्र यासाठी एक अट घालण्यात आली आहे. तुम्हाला आधार एनेबल्ड पेमेंट सर्व्हिस, रुपे कार्ड, भीम अप, किंवा युएसएसडी बेस्ड *99# याच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करावा लागेल. दरम्यान नोटाबंदीनंतर महाराष्ट्र, आंध्रप्रदेश,तामिळनाडु, उत्तरप्रदेश आणि कर्नाटकमध्ये कॅशलेस ट्रान्झक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलाय. जाहीर करण्यात आलेल्या विजेत्यांमध्ये या पाच राज्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























