एक्स्प्लोर

नेदुमारन यांचं साकडं अन् इंदिरा गांधींनी लिट्टेच्या प्रभाकरनला सोडलं; नंतर त्यानेच केली राजीव गांधींची हत्या 

LTTE Prabhakaran: प्रभाकरनला संपवल्याचा दावा श्रीलंकेने या आधीच केला होता, पण प्रभाकरन जिवंत असून तो लवकरच पुन्हा सक्रिय होणार असल्याचं पी नेदुमारन यांनी सांगितलंय. 

मुंबई: एलटीटीईचा प्रभाकरन (LTTE Prabhakaran) जिवंत असून तो लवकरच पुन्हा सक्रिय होणार असल्याचा दावा तामिळनाडू काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पी नेदुमारन (P Nedumaran) यांनी केला आहे. नेदुमारन यांच्या दाव्यानंतर आता केवळ भारत- श्रीलंकाच नव्हे, तर जगभरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे. तामिळ वंशाच्या लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रभाकरनचा खात्मा केल्याचा दावा 2009 सालीच श्रीलंकेने (Sri Lanka) केला होता. आता नेदुमारन यांच्या नव्या दाव्यामुळे जगभरातल्या गुप्तचर खात्यांनाही कामाला लावलं आहे. पण कुणाच्याही हाती न सापडणारा हा प्रभाकरन एकदा भारताच्या हाती लागला होता आणि त्याची सुटका खुद्द त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीच केली होती. महत्त्वाचं म्हणजे ज्या इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी प्रभाकरनची सुटका केली, त्याच इंदिरा गांधीच्या मुलाची म्हणजे राजीव गांधी (Rajiv Gandhi Assasination Case) यांची हत्या त्याच प्रभाकरनने केली. इंडिया टुडेचे माजी पत्रकार आणि लिट्टेचा उदय-अस्त जवळून पाहिलेल्या अनिरुध्य मित्रा (Anirudhya Mitra) यांनी याविषयी माहिती दिली. 

LTTE Prabhakaran Arrested: एकमेकांच्या जीवावर उठलेल्या तरुणांना अटक 

19 मे 1982 रोजी, तामिळनाडू पोलिसांनी मद्रास शहरातील पाँडी बाजाराच्या गजबजलेल्या ठिकाणी दोन श्रीलंकन तरुणांना अटक केली होती. हे दोन तरुण सिनेमा थिएटरच्या बाहेर, एकमेकांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत होते. वरवर साध्या दिसणाऱ्या या अटकेमुळे भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांमध्ये खळबळ उडाली.

Indira Gandhi On LTTE: इंदिरा गांधींनीच सुटका करण्याचे आदेश दिले

या दोन्ही तरुणांच्या सुटकेसाठी आणि श्रीलंकेत पुन्हा पाठवण्यासाठी वाटाघाटी सुरु झाल्या. त्यावेळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पी नेदुमारन यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन (MGR) यांच्यामार्फत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क साधला आणि या दोन्ही तरुणांना तात्काळ सोडण्यात यावं अशी विनंती केली. नेदुरमारन यांच्या विनंतीनंतर या दोन्ही युवकांना सोडण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी दिला. 

Rajiv Gandhi Assasination Case: एका दशकानंतर त्याच तरुणांना राजीव गांधींना संपवलं

एका दशकानंतर, सुटका झालेल्या तरुणांपैकी एकाने, इंदिरा गांधीं यांचा मुलगा आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येचा कट यशस्वीपणे रचला. ज्या तरुणाला इंदिरा गांधी यांनी आपल्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या विनंतीवरुन सोडलं त्याच तरुणांने इंदिरा गांधी यांच्या मुलाचीच हत्या केली. इंदिरा गांधी यांनी सुटका केलेला तो तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून लिट्टे- लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE) प्रमुख प्रभाकरन हाच होता. 

P Nedumaran on LTTE Prabhakaran: पी नेदुमारन यांचा दावा काय?

लिट्टेचा प्रमुख प्रभाकरन जिवंत असून तो लवकरच पुन्हा सक्रिय होणार आहे असं वक्तव्य आता त्याच पी नेदुमारन यांनी केलं आहे. प्रभाकरन हा आपल्या संपर्कात असून लवकरच तो तामिळ वंशाच्या लोकांच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहे, जगातील सर्व तामिळ जनतेने त्यांना एकत्रितपणे पाठिंबा द्यावा असंही पी नेदुमारन यांनी सांगितलं. 

श्रीलंकेतील गृहयुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, 18 मे 2009 रोजी श्रीलंकेच्या सैन्याने प्रभाकरनला ठार मारले होते असा दावा केला होता. 2009 मध्ये श्रीलंकेच्या लष्कराने प्रभाकरनचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतरच त्याच्या मृत्यूची पुष्टी झाली. त्याचा मृतदेह उत्तर श्रीलंकेतील मुल्लिवायकल येथील जंगलात सापडल्याचे सांगण्यात आलं होतं. त्यानंतर प्रभाकरनच्या मृतदेहाची ओळख लिट्टेच्या माजी लेफ्टनंट असलेल्या करुणा अम्मान यांनी पटवली होती. करुणा अम्मान या सरकारला शरण गेल्यानंतर महिंदा राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं होतं. 

Srilanka Reaction On LTTE Prabhakaran: नेदुमारन यांचा दावा श्रीलंकेने फेटाळला 

श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रवी हेराथ यांनी प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा फेटाळला आहे. प्रभाकरनचा मृतदेह सापडल्यानंतर आम्ही त्याचे सर्व डीएनए रिपोर्ट तपासले होते आणि त्यानंतरच त्याच्या मृत्यूची घोषणा केली होती असं ते म्हणाले. तर श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साब्री यांनी यासंबंधित सर्व अहवाल तपासले जातील आणि नंतर भाष्य केलं जाईल असं म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Somvati Amvasya:नववर्षाचं निमित्त सोमवती अमावस्येमुळे तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दीRajkiya Shole Mohan Bhagwat : संघ विरुद्ध भाजप असं  चित्र कोण रंगवतयं?Rajkiya Shole Suresh Dhus : धसांचा तोफखाना सुरुच, बीडच्या राजकारणाला मराठा-ओबीसी असा रंग?Special Report on Nitesh Rane : केरळला पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंवर कारवाई होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
WTC मध्ये जसप्रीत बुमराहची अप्रतिम कामगिरी, मात्र टीम इंडिया पिछाडीवर, भारताचं नेमकं काय चुकलं? 
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेक्स मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेक्स मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल
Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 
Embed widget