Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
दोघींचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही मुली केस ओढताना आणि रस्त्यावर एकमेकींना चोपताना दिसून येत आहेत.
Dehradun Viral Video : उत्तराखंमध्ये डेहराडूनच्या रायपूर भागात दोन तरुणींमध्ये भर रस्त्यात एकमेकींना लाथा घालून, झिंज्या ओढून तुफानी राडा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन्ही मुली रस्त्यात एकमेकांशी जोरदार भांडताना दिसल्या. कथितपणे हा राडा एका बाॅयेफ्रेंडवरून झाल्याचे दावा करण्यात येत आहे.
रस्त्यावर एकमेकींना चोपले
दोघींचा मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही मुली केस ओढताना आणि रस्त्यावर एकमेकींना चोपताना दिसून येत आहेत. आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसले, मात्र दोघांनीही कोणाचेच ऐकले नाही. सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला मनोरंजन म्हणत आहेत तर काही जण याला लज्जास्पद घटना म्हणत आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका मुलासोबतच्या मैत्रीच्या वादातून भांडण झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेने लोकांचे लक्ष तर वेधलेच पण तरुण पिढीच्या वागणुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेबाबत सध्या पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
देवभूमि की देवियां..
— Vivek K. Tripathi (@meevkt) December 17, 2024
बीच सड़क पर लड़ रही लड़कियों का ये वीडियो उत्तराखंड का है.. एक दूसरे को गिरा गिरा कर पीट रहीं.. एक से बढ़कर एक गालियां मुंह से निकल रहीं.. लड़ने में कपड़ों का भी ख्याल नहीं.. लोग तमाशा देख रहे.. ऐसी लड़ाई कि लड़के भी शरमा जाएं.. कहां जा रहा समाज?? pic.twitter.com/zlc7Tz4k4K
सोशल मीडियावर यूजर्स काय म्हणाले
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. कोणीतरी म्हणाले आता मला सांगा पोलिस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार की नाही. कोणी म्हणाले की आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत, याशिवाय एका यूजरने लिहिले - जर त्यांच्या जागी मुले असते तर पोलिस, लोकांनी एवढा गोंधळ घातला असता.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या