Lockdown 5.0 | आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासावर काहीही निर्बंध नाही
मालवाहतूक तसेच व्यक्तींना विनापरवाना आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवास/वाहतूक करता येणार आहे. यासाठी कुठल्याही ई-परमिट किंवा ई-पासची गरज लागणार नाही.
![Lockdown 5.0 | आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासावर काहीही निर्बंध नाही Lockdown 5.0, no restrictions on interstate or interstate travel Lockdown 5.0 | आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासावर काहीही निर्बंध नाही](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/31022544/Lockdown.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. त्यानुसार देशातील कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. मात्र कटेंनमेंट झोन वगळता इतर भागात टप्प्याटप्याने सूट देण्यात येणार आहे. यापुढे आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवासाला कसलीही परवानगी लागणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासंबंधीचे निर्णय राज्य सरकारंही घेऊ शकतात.
मालवाहतूक तसेच व्यक्तींना विनापरवाना आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत प्रवास/वाहतूक करता येणार आहे. यासाठी कुठल्याही ई-परमिट किंवा ई-पासची गरज लागणार नाही. मात्र राज्य सरकारला स्थानिक परिस्थितीच्या आकलनानुसार आवश्यक वाटलं तर ते जिल्हांतर्गंत तसेच राज्याबाहेरच्या प्रवासावर निर्बंध घालू शकतात.
Lockdown 5.0 | देशभरात लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला, ल़ॉकडाऊन कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित
लॉकडाऊन 5.0 हा फक्त कंटेनमेंट झोनपुरताच मर्यादित आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील निर्बंध टप्प्याटप्याने कमी होणार आहे. हा लॉकडाऊन मुख्यत्वे तीन फेजमध्ये असणार आहे. प्रत्येक फेजमध्ये काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)