Coronavirus Cases : कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासात देशात 10 हजार 649 नवीन रुग्णांची नोंद
कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus Cases) वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Coronavirus Cases : कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus Cases) वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 10 हजार 649 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, काल देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळून आले होते. काल देशात 8 हजार 586 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामध्ये वाढ झाली आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत देशातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा हा 4 कोटी 43 लाख 68 हजार 195 वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळं 5 लाख 27 हजार 452 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अशातच दिलासादायक बातमी म्हणजे देशातील रिकव्हरी रेट वाढला आहे. देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. पण यापैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 37 लाख 33 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 88.35 कोटींहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट हा सध्या 3.32 टक्के आहे. तर रोजचा पॉझिटीव्हीटी रेट हा 2.62 टक्के आहे.
Single day rise of 10,649 new coronavirus infections push India's COVID-19 tally to 4,43,68,195, death toll climbs to 5,27,452:Govt
— Press Trust of India (@PTI_News) August 24, 2022
महाराष्ट्रात 1 हजार 910 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
दरम्यान, राज्यात मंगळवारी 1 हजार 910 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1 हजार 273 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर सात कोरोनाबाधित रुग्णांच्या (Maharashtra Corona Death) मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79 लाख 26 हजार 918 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. सध्या राज्यात एकूण 12 हजार 355 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 6 हजार 269 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2 हजार 138 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत रुग्णसंख्येत वाढ
मंगळवारी मुंबईत 832 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंळवारी 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,13,829 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.7 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,675 झाली आहे. सध्या मुंबईत 6,269 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 832 रुग्णांमध्ये 783 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: