(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir : सुरक्षा दल आणि VIP वर हल्ला करण्याचा कट फसला; लष्कर-ए-तय्यबाच्या दहशतवाद्याला अटक
Jammu Kashmir : हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रफियााबाद आणि सोपोर भागात सुरक्षा दल आणि व्हीआयपींना लक्ष्य करण्याचा कट रचत होता.
Jammu Kashmir Terrorist Arrest : भारतीय लष्कराने लष्कर-ए-तयब्बाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील रफियााबाद आणि सोपोर भागात सुरक्षा दल आणि व्हीआयपींना लक्ष्य करण्याचा कट रचत होता. रिजवान शफी लोन असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो हंदवाडा येथील रहिवासी आहे.
पिस्तूलसह दारूगोळा जप्त
विशिष्ट माहितीवर कारवाई करत, रफियााबाद आर्मीने रफियााबाद पोलिसांसह रोहामा येथे संयुक्त कारवाई सुरू केली आणि एका दहशतवाद्याला पकडले, असे भारतीय लष्कराच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. त्याच्याकडून पिस्तूलसह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. लष्कराच्या वतीने असे सांगण्यात आले की, हा दहशतवादी लष्कर-ए-तयब्बाच्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. तसेच रफियााबाद आणि सोपोर भागात सुरक्षा दल आणि व्हीआयपींवर हल्ला करून त्यांना ठार मारण्याची योजना आखत होता. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका दहशतवादी ठार
दहशतवाद्यांच्या शोधासाठी काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाकडून सतत शोध मोहीम राबवण्यात येत आहे. 11 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यादरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, यादरम्यान दोन दहशतवादी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक AK-47 रायफल, 3 मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांना मिळणार अत्याधुनिक 'झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल
जम्मू आणि काश्मीर पोलिसांना लवकरच अत्याधुनिक 'झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल मिळणार आहेत. पिस्तूल पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्यात 100 झेन शूटएज' कॉर्नर शॉट पिस्तूल पोलीसांना पुरवण्यात येणार आहेत. हे पिस्तूल वापरणारी व्यक्ती लपून आणि भिंतीवरून देखील गोळ्या झाडू शकते. याबाबत माहिती देताना सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले की, " जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळणारे हे आधुनिक शस्त्र दहशतवादविरोधी मोहिमेमधील पथकातील सैनिकांचे गोळीबारापासून संरक्षण करेल.
महत्वाच्या बातम्या