एक्स्प्लोर

Himachal Khalistan Banners : खालिस्तानी झेंडे प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपींना पकडण्यासाठी सीमा बंद

Himachal Pradesh Khalistan Banners : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य गेटवर खलिस्तानी झेंडे लावण्यात आले होते. याविरोधात आता कारवाई करण्यात येत आहे.

Himachal Pradesh Khalistan Banners : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर खलिस्तानी झेंडे लावल्याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. हिमाचल पोलिसांनी या प्रकरणात शिख फॉर जस्टिसचे जनरल कौन्सिल गुरपतवंत सिंह पन्नू यांना मुख्य आरोपी घोषित केलं आहे. याप्रकरणी आता एफआयआरही नोंदवण्यात आला आहे, ज्यामध्ये UAPA म्हणजेच दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणे यासह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश
हिमाचल प्रदेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भादंवि कलम 153-ए, 153-बी आणि UAPA कलम 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना पकडण्यासाठी आंतरराज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना सीमा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांकडून खलिस्तानी समर्थक लपून बसल्याची शक्यता असलेल्या सर्व ठिकाणांवर छापेमारीही सुरु आहे.

काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेश विधानसभेच्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच मेन गेटवर रविवारी खलिस्तानी झेंडे टांगण्यात आले होते. याशिवाय विधानसभेच्यां भिंतींवर काही आक्षेपार्ह मजकूर आणि घोषणाही लिहिण्यात आल्या होत्या. हिमाचल प्रदेश विधानसभा संकुलाच्या मुख्य गेट क्रमांक एकच्या बाहेरील बाजूस खलिस्तानी झेंडे लटकलेलं आढळून आलं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रशासनाने झेंडे हटवले. खलिस्तानी झेंडे हटवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेचा अनेक ठिकाणी निषेध करण्यात आला. 

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या प्रकरणाचा निषेध केला. त्यांनी या प्रकरणी निषेध करत सांगितले की, 'दोषींवर लवकरच कारवाई केली जाईल. ठाकूर यांनी म्हटलं की, 'हिमाचल सामंजस्यपूर्ण राज्य असून इथे शांतता कायम राहायला हवी. या प्रकरणातील दोषी कुठेही असोत, त्यांना लवकरच पकडले जाईल. दोषींवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल.'

मनीष ससोदिया यांचा भाजपावर निशाणा
हिमाचल प्रदेशामध्ये भाजपचं सरकार आहे. या प्रकरणावर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सिसोदिया यांनी म्हटलं आहे की, 'ज्या सरकारला विधानसभेचं संरक्षण करता आलं नाही ते सरकार जनतेचं संरक्षण कसं करेल? हा हिमाचल प्रदेशच्या अब्रूचा आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Abhijeet Dipke : संविधान दिनी नागपुरात मोठा धमाका होणार, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; भाजप सरकारवर गंभीर आरोप
संविधान दिनी नागपुरात मोठा धमाका होणार, अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा; भाजप सरकारवर गंभीर आरोप
Akhilesh Yadav Facebook : मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
मोठी खळबळ! अखिलेश यादव यांचं फेसबुक अकाऊंट अचानक गायब; दीड तासांच्या नाट्यानंतर मेटाकडून मोठं पाऊल
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Sonia Gandhi Book : सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून सोनिया गांधी यांना नोटीस; 15 दिवसांत उत्तर न दिल्यास मानहानीची याचिका दाखल, नेमकं काय आहे कारण?
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
Embed widget