एक्स्प्लोर
'सर्जिकल स्ट्राईक'मधील जवानाला सीमेवर वीरमरण
संदीप सिंह हे जम्मू काश्मीरमधील तंगधार परिसरातील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी तैनात केलेल्या तुकडीत होते. त्यावेळ घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत सोमवारी त्यांना वीरमरण आलं.
श्रीनगर: पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी असलेला भारताचा जवान शहीद झाला आहे. तंगधार सेक्टरमधील चकमकीदरम्यान लान्स नायक संदीप सिंह यांना वीरमरण आलं.
संदीप सिंह हे जम्मू काश्मीरमधील तंगधार परिसरातील दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी तैनात केलेल्या तुकडीत होते. त्यावेळ घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत सोमवारी त्यांना वीरमरण आलं.
संदीप सिंह हे एलओसीवर दहशतवाद्यांशी दोन हात करत होते. त्यावेळी त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा आहे.
सर्जिकल स्ट्राईकचा मराठमोळा रिअल हिरो!
संदीप सिंह हे भारताने 2016 मध्ये पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सहभागी होते. त्यावेळी भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं.
संदीप सिंह हे तमाम जवानांसाठी हिरो होते. ते 4 पारा (स्पेशल फोर्स) युनिटचे सदस्य होते.
सर्जिकल स्ट्राईकच्या रात्रीचा थरार, जसाच्या तसा...
शहीद होण्यापूर्वी संदीप सिंह यांनी दोन घुसखोरांना ठार केलं होतं. मात्र दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत संदीप सिंह यांनाही बलिदान द्यावं लागल्याने, सोशल मीडियावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.
उरी हल्ल्याच्या दहा दिवसानंतर भारतीय लष्करानं 28-29 सप्टेंबर 2016 रोजी सीमेपार जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करुन सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यात जवळजवळ 50हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता.
संबंधित बातम्या
सर्जिकल स्ट्राईकच्या रात्रीचा थरार, जसाच्या तसा...
सर्जिकल स्ट्राईक: वेळ आणि ठिकाण आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं!
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकवर शाहिद आफ्रिदी म्हणतो...
आमच्या शूर सैन्याला सलाम : अदनान सामी
सर्जिकल स्ट्राईकचा मराठमोळा रिअल हिरो!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement