एक्स्प्लोर

Lalu Yadav News : लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, पुढील उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीला हलवणार

Lalu Yadav Health Updates : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर. पुढील उपचारासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सनं दिल्लीला हलवण्यात येणार आहे.

Lalu Yadav Health Updates : आरजेडी नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी एअर अॅम्ब्युलन्सनं त्यांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आज दिल्लीत जाऊन संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे. लालू यादव सध्या पाटण्यातील पारस रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. पाटण्यातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना दिल्लीला आणलं जाणार आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान मोदी, गांधी परिवार आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह इतरही अनेक नेत्यांनी तेजस्वी यादव यांच्याकडे विचारपूस केली. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या प्रकृती स्वास्थासाठी जनतेकडून प्रार्थना केली जात आहे. त्यांना भेटण्यासाठी अनेक नेते आणि कार्यकर्ते पारस रुग्णालयात पोहोचले आहेत. याबाबत तेजस्वी यादव यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमधून तेजस्वी यादव यांनी लोकांना आवाहन केलं आहे. ते म्हणाले आहेत की, "लालू प्रसाद यादव यांच्यावर पाटणा येथील पारस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कृपया त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी करु नका. त्यामुळे रुग्णालयातील इतर रुग्णांना खूप त्रास होतो आणि संसर्गाचा धोका वाढतो."

दरम्यान, चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. लालू प्रसाद यादव काही दिवसांपूर्वी शिडीवरुन पडल्यामुळे जखमी झाले होते. बिहारची राजधानी पाटणा येथील राबरी निवासस्थानी शिडीवरून खाली उतरत असताना त्यांचा तोल गेला आणि ते पडले. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. लालूंच्या खांद्यावर आणि कमरेलाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी काळजी करण्यासारखं काहीही नसल्याचं सांगितलं होतं. उजव्या खांद्याला किरकोळ फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर ते घरीच विश्रांती घेत होते. पण काही दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना पाटणातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tamilnadu Custodial Deaths: बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
Assembly Election 2026: आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आसामसह केरळ आणि पुदुचेरीमध्ये मतदानाची रणधुमाळी, 296 जागांसाठी 1,995 उमेदवारांच आज भवितव्य ठरणार; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 एप्रिल 2026 | गुरुवार
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
सुनेत्रा पवारांसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत गोपीचंद पडळकर; भाजपकडून 40 नेत्यांची यादी आयोगाकडे सादर
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
युरोपियन महासंघाने इस्रायलसोबतचे सर्व व्यापारी करार तातडीने स्थगित करावेत, नेतान्याहूंकडून मानवी जीवन, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अनादर असह्य, गुन्हेगारी कृत्यांसाठी सूट नको; स्पेनच्या पंतप्रधानांचा सडकून प्रहार
Baramati Byelection: बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
बारामतीत शेवटच्या दिवशी काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे; अभिजीत बिचुकले अन् करुणा शर्मा मैदानात
Embed widget