Lakhimpur Accident : भाजप आमदाराच्या गाडीनं दुचाकीस्वार दोन भावांना चिरडलं, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
Lakhimpur Kheri Accident : 'आमदार' स्टिकर असलेल्या गाडीमुळे मोठा अपघात झाला. वेगवान स्कॉर्पिओने 2 जणांना तुडवले. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Lakhimpur Kheri Accident : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. येथे भाजप आमदाराच्या गाडीने दोघांना चिरडलं आहे. आमदाराचं स्टिकर असलेल्या गाडीनं दुचाकीस्वार भावांना उघडलं आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात केलेली कार आमदाराची असल्याचं सांगितलं जात आहे. कार आणि चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा अपघात कोतवालीच्या रामापूरजवळ झाला आहे. ही कार भाजप आमदार योगेश वर्मा यांची असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत लखीमपूर खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरतपूर या गावचे रहिवासी आहेत. रामापूरहून घरी परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले. योगेश वर्मा यांची पत्नी नीलम वर्मा यांच्या नावावर कारची नोंदणी असल्याचं सांगण्यात येत आहे.
अपघाताच्या वेळी आमदार गाडीत नव्हते असं सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरुण सिंह यांनी सांगितलं की, 'लखीमपूर-बहराइच रस्त्यावर रामापूरजवळ दुचाकी आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी आढळलेली स्कॉर्पिओ गाडी भाजप आमदार योगेश वर्मा यांची आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.'
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही झाला होता अपघात
याआधी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही लखीमपूर खेरी येथे अपघात झाला होता. गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या भेटीला शेतकऱ्यांचा एक गट विरोध करत होता तेव्हा एका एसयूव्हीने चार शेतकऱ्यांना चिरडलं होतं. कथित घटनेनुसार संतप्त आंदोलकांनी दोन भाजप कार्यकर्ते आणि एका ड्रायव्हरला बेदम मारहाण केली, तर एका स्थानिक पत्रकाराचाही हिंसाचारात मृत्यू झाला. आशिष मिश्रा हे आंदोलकांना चिरडणाऱ्या वाहनात होते, असा दावा शेतकरी नेत्यांनी केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha