एक्स्प्लोर

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या: खा. महाडिक

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

नवी दिल्ली: लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अशी मागणी कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली. लोकसभेमध्ये आज लक्षवेधी उपस्थित करत खासदार धनंजय महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शाहू महाराज यांचं कार्य महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक इतिहासामध्ये महत्त्वाचं आहे. आज आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची गोष्ट होते, पण देशात पहिलं आरक्षण शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात लागू केलं होतं, असं म्हणत धनंजय महाडिक यांनी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला आहे. त्यामुळे शाहू महाराजांनाही भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान सरकारने करावा, असं धनंजय महाडिक म्हणाले. राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या: खा. महाडिक धनंजय महाडिक लोकराजा शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज हे खरेखुरे लोकराजे होते. कोणत्याही बदलाची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. त्यांनी शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा, कृषी  यासारख्या सर्व विषयांमध्ये मोठं काम केलं. देशात त्याकाळी मागासलेल्या जातींमध्ये शिक्षणाबद्दल आस्था नव्हती, नोकरीत स्थान नव्हते. त्यावेळी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण लागू केलं होतं. कोल्हापूर संस्थानातील मुलांना उच्चशिक्षण मिळावं म्हणून त्यांनी विविध जातीची वसतिगृहे बांधली.  शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही उच्च शिक्षणासाठी मदत केली. असं एकही क्षेत्र नाही ज्यामध्ये शाहू महाराजांनी काम केलं नाही. भारतरत्न पुरस्कार 1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न कोणालाही जाहीर झालेला नाही. आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी : पुरस्कारार्थीचे नाव                                                वर्ष 1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972)             1954 2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 )           1954 3. डॉ. सी.व्ही. रमण (188-1970)                            1954 4. डॉ. भगवान दास (1869 – 1958)                       1954 5. डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 )                    1955 6. पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 )           1955 7. पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 )            1957 8. डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 )                 1958 9. डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 )                        1961 10. पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 )                1961 11. डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963)                       1962 12. डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 )                    1963 13. डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 )          1963 14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 ) 1966 15. इंदिरा गांधी (1817 - 1984 )                               1971 16. व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 )                         1975 17. के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 )          1976 18. मदर टेरेसा (1910 - 1997 )                              1980 19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 ) 1983 20. खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 )      1987 21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 )      1988 22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 ) 1990 23. डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 )                          1990 24. राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 )                1991 25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 ) 1991 26. मोरारजी देसाई (1896 - 1995 )                              1991 27. मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958)  1992 28. जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 )                        1992 29. सत्यजीत रे (1922 - 1992 )                                1992 30. गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 )                       1997 31. श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 )     1997 32. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931)      1997 33. श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 )         1998 34. सी. सब्रमण्यम (1910 - 2000 )             1998 35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 )     1999 36. प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 )  1999 37. लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 )  1999 38. पंडीत रवी शंकर (1920 - 2012 )  1999 39. लता मंगेशकर (जन्म 1929 )      2001 40. उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 ) 2001 41. पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 ) 2009 42. प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 ) 2014 43. सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 ) 2014 44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946) 2015 45. अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 ) 2015 संबंधित बातम्या  भारताचे अनमोल रत्न, हे आहेत आतापर्यंतचे 45 'भारतरत्न' !  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळGulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget